अनुरागी अनुबंध
हा जन्मच सारा तुझ्याचसाठी गांठ बांधलेली जन्मोजन्मीची… तुच अशी लाघवी मन प्रीतपरी उलघाल उरी अधीर स्पंदनांची… भावशब्दांची तू पावन गंगोत्री गुणगुणणारी धुन तू बासुरीची…. आत्मरंगला, आत्माराम माझा मोदे गातो गीता या जीवनाची…. हा अव्यक्त, अनुरागी अनुबंध जशी रांगोळी प्राजक्त फुलांची…. रंगगंधता जीव सारा चंदन होतो हीच कृपा कृपाळु त्या अनंताची रचना क्र. ४९ १५/६/२०२३ – वि.ग.सातपुते.(भावकवी) […]