नवीन लेखन...

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ […]

आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।। १   ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण  ।। २   विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना  ।। ३ […]

बहिरा ऐके कीर्तन

गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत […]

दर्पण

चित्र दिसते दर्पणी , जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी, अस्पष्ट ते होतसे ।।१।।   दर्पणा परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी ।।२।।   निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या  त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

जातीमधील उद्रेक

लाट उसळतां ती क्रोधाची,  बळी घेतले कित्येकाचे हिंसाचाराच्या लाटेमध्यें,  सर्वस्व गमविले कांहींचे…१, फार पूरातन काळीं आम्हीं,  चालत होतो एक दिशेनें कुणीतरी फोडून वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने…२, त्याच क्षणाला बिज रूजले,  धर्मामधल्या विषमतेचे ईश्वराकडे त्या जाण्याकरितां,  मार्ग पडती विविधतेचे….३, विविधतेनें संघर्ष आणिला,  भेदभावाची भिंत उभारूनी विवेकाला गाडून टाकले,  उफाळणाऱ्या भावनांनी, चूक कुणाची सजा कुणाला,  कालचक्राची […]

ध्यान

ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार…..१ स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे…२ लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी…३ साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत शांत करिल मना, बघून प्राण ज्योत…४ काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान करण्यास तुम्ही जावे,  जाईल […]

काव्यातील गुरु

एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विणा  । काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा  ।।  १   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं  । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी  ।।  २   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती  । शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती  ।।  ३   मार्गदर्शक तो भेटत नाही,  […]

सासरी जाताना

हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला…. ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला…१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो, […]

इतरांतील लाचारी बघे

शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ….।।धृ।।   पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी…१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी   शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरिर सौख्यापरि….२ […]

भिकाऱ्याचे पुण्य

रखरखत्या उन्हांत बसूनी,  भीक मागतो एक भिकारी जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी…१, नजीक येत्या वाटसरूंना,  आशिर्वाद तो देत असे ‘प्रभू तुमचे भले करिल’   हेच शब्द ते उमटत असे…२, अन्न न घेता दिवस जाई,  खात भाकरी एकच वेळां दिवसभरीचे श्रम होवूनी,  उपवास तो सदैव घडला…३, पूर्व जन्मीच्या कर्मफळाने,  दीनवाणी ते जीवन मिळाले आज पुण्याच्या राशि […]

1 110 111 112 113 114 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..