नवीन लेखन...

कवच

आघात होवूनी परिस्थितीचे,  सही सलामत सुटत असे संकटाची चाहूल लागूनी,  परिणाम शून्य तो ठरत असे…१, दु:खाची ती चटकती उन्हे,  संरक्षणाची छत्री येई कोणती तरी अदृष्य शक्ती,  त्यास वाचवोनी निघून जाई….३, दूर सारूनी षडरिपूला,  मनावरती ताबा मिळवी प्रेमभाव तो अंगी करूनी,  तपशक्तीला सतत वाढवी…३, तपोबलाचे बनूनी कवच,  फिरत होते अवती भवती दु:खाचे ते वार झेलूनी,  रक्षण त्याचे […]

देह मंदीर

शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण,  चांगले ठेवा देहाला…१ व्यायाम व आहार,  असतां नियमित सुदृढ ते शरीर,  असते मग बनत…२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३ षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी…४ देह आहे मंदीर,  गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर,  आनंद […]

बंधनातील चिमणी

चिव चिव करीत,  एक चिमणी आली  । दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली  ।। १ बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती  । वाटूं लागले या चिमणीला,  आंत अडकली ती  ।।२ उत्सुकता नि तगमग दिसे,  चेहऱ्यावरी  । चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी  ।।३ औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही  । कशी करूं तिची बंधन मुक्ती,  […]

सुप्रसिध्द हिंदी कविता ‘मोची’ चा मराठी अनुवाद

हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे. ( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 […]

त्यागवृत्ति

जीवनाच्या सांज समयीं  । उसंत मिळतां थोडीशी  ।। हिशोब केला स्वकर्माचा  । वर्षे गेली होती कशी  ।।   दिवसामागून वर्षे गेली  । नकळत अशा वेगानें  ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं  । जीवन गेले क्रमाक्रमानें  ।।   आज वाटे खंत मनीं  । आयुष्य वाया दवडिले  ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां  । हातीं न कांहीं राहीले  ।।   ‘ […]

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून […]

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।।   प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।।   प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

फुलझाडाचे स्वातंत्र

उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी // जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी // वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें // वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा// कुणीतरी आला वाटसरु तो घेउन […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

1 115 116 117 118 119 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..