नवीन लेखन...

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।।   नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।।   जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली  ।।१   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे ।।२   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा ।।३   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला ।।४   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो ।।५ […]

 पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।।१ स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।।२ सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।।३ करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन    खोदून आणली माती कौशल्य पणास लावून   केला मी गणपती   ।।१।।   मुर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां दाम मिळेल ठिक   हीच आली भावना   घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत   बहूत दिवस प्रयत्न केला    कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला    गणपती मी शाळेत   […]

तपसाधनेतील परिक्षा

पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे […]

क्षण मुक्तीचा

तपसाधना करूनी मिळवी,  सत्वगुणाची शक्ती अंगी  । त्याच शक्तीच्या जोरावरती,  स्थान लाभे त्यांना स्वर्गी  ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,  सारे सुख आणि भोग भोंवतीं  । परिणामी तो फेकला जाऊनी,  पुनरपी येई याच भूवरती  ।। एक दया दाखवी ईश्वर,  वातावरणी देऊनी संधी  । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,  कमविले पुण्य ज्याने आधी  ।। चक्र खेळ हा […]

आई

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ‘ प्रेमची ‘ वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ […]

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला…४   डॉ. […]

1 116 117 118 119 120 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..