नवीन लेखन...

मी कोण आहे

मी कोण आहे मी एक स्त्री आहे आई-बाबांच्या लाडात वाढलेली थोडीशी खोडकर थोडीशी हट्टी मी एक मुलगी आहे मी एक स्त्री आहे मातापित्यांच्या सावलीत वाढलेली चांगले संस्कार घडलेली थोडीशी अल्लड, थोडीशी बालिश मी एक कळी आहे मी एक स्त्री आहे त्याची ती आहे होय प्रेयसी आहे स्वप्नात वावरणारे मी एक परी आहे मी एक स्त्री आहे […]

सुखामागे धावताना

सुखामागे धावताना माणूसच हरवला आहे आयुष्य जगताना आपली नाती विसरला आहे भविष्याची तयारी करताना मनातील भाव हरवला आहे – गायत्री डोंगरे व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

मैत्री

मैत्री असते आंबट गोड हृदयाला हृदयाची जोड मैत्री असते मायेची पाखर तुझ्या सुखाला माझ्या आनंदाची झालर मैत्री असते राधाकृष्णाची बासरीच्या सुरात विरघळण्याची मैत्री असते जिवाभावाची मनातले गुपित हळूच ओळखण्याची मैत्री असते हळवे पणाची माझे अश्रु तिने पुसण्याची मैत्री म्हणजे सतारीची तार माझ्या वेदनेचे तुझ्या काळजात झंकार मैत्री म्हणजे आंधळ्याचा डोळा रणरणत्या उन्हात बर्फाचा गोळा -स्वप्ना साठे […]

आठवणींच्या विश्वात

वाळूत ओढत रेघा, मी बसले होते आठवणींच्या विश्वात मी रमले होते. कुठून तरी चाहुल मला लागली दुसरे नव्हते कुणी माझेच मन होते कधी मी मनाला कधी मन मला अनेक आठवणींचे झरे वहात होते आठवणीच्या झऱ्यांनी शब्द मूक झाले बोलण्याचे काम मग अश्रूंनीच केले. – कु. निलांबरी शां. पत्की व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

स्त्री

स्त्री आहे अंबा,दुर्गा आणि काली, अष्टभुजा धारण करणारी रणरागिणी. सांभाळ करून सर्व नात्यांचा प्रेमाने, गाजवते अधिराज्य जगात शक्तीने आणि युक्तीने. बाबांच्या ह्या इवल्याश्या परीने, फुलविला तिचा संसार स्वकर्तृत्वाने. मिळाली देणगी मातृत्वाची हिच्या उदरी, संयमाने करते ती पालनपोषण दिवस-रात्री. शिकवतेस जगाला प्रेम, आपुलकी आणि माया, नाही पडू देत संसारावर कधी दुःखाची छाया . सांभाळताना तुझ्या संसाराचा गाडा, […]

स्वप्न

डॉ. संकेत शरद पेडणेकर याची कविता… स्वप्न स्वप्न स्वप्न स्वप्न नेहमी बघायचं असतं पण काळजीने की ते विकृत स्वप्न नसते स्वप्नामुळे होतात आपले सुविचार पूर्ण जागे त्याचमुळे मरतो आपला आळस ज्याच्यामुळे आहोत आपण मागे त्याचमुळे होते तयार आपली सारी जिद्द त्याचमुळे होते एक शक्ती संपूर्णपणे सिद्ध ती शक्ती म्हणजे झेलायचे घाव आणि वळ मगच मिळते हाती […]

बाप बाप म्हणजे काय

बाप बाप म्हणजे काय कसा असतो ठाव नाय  ! व्हते मी पाळण्यात जव्हा देवा घरी गेला तो तव्हा ! शेजारला व्हती मैत्रीण चिऊ तिचा बाप आणत व्हता खाऊ ! माला वाटे तिचा हेवा मालाबी बाप हवा ! डोळे  माझे पाणावलेले असत  माय कड जाय मी पुसत ! तक्रार एकच व्हती  माझी , “का नाय माला बी बाप “? कुरवाळुनी माय म्हणे  “मीच तुझी माय  न  मीच तुझा बाप!”

वाट पाहतो पावसाची

केली मशागत शेतीची झाली स्वच्छता वावराची वाट पाहतो पेरणीची मेघराजाच्या आगमनाची मे महीना ही गेला जुन निम्मा हो झाला एक थेंब ही नाही पावसाचा कधी येईल पावसाळा बरसावे पावसाने शेतीला चिंब करावे शिवारात पाणी पाणी व्हावे शेत पेरणीसाठी सज्ज आहे मग होईल पेरणी जोमात बिज अंकुरेल कोंबात तरारेल पीक शेतामधी हीरवगार रान होईल पण आहे प्रतिक्षा […]

तलवार आणि लेखणी !

लेखणी व तलवारीची आमनेसामने भेट झाली, दोघात मग श्रेष्ठतेवरून बरीच वादावादी रंगली ! सांगे तलवार लेखणीला, इतिहासाच्या वाच कथा, वाचून बघ समजतील तुला माझ्या पराक्रमांच्या गाथा ! जिंकली अनेक वीरांनी युद्धे माझ्याच बळावर, ठेवून भरवसा माझ्याच, धारधार तलवारीवर ! बोले तलवारीस लेखणी, रक्तरंजित तुझी कहाणी, झाल्या तुझ्यामुळे विधवा नाहक गरीब सवाशिणी ! माझ्या शब्दांच्या माऱ्यापुढे धार […]

गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो

गलेलठ्ठ नोटांच्या गठ्ठ्यांनो आणि खणखणीत आवाज उमटवणाऱ्या तालेवार, चमकदार नाण्यांनो… डॉलर, पौंड, युरो, दिनार, रुपये ही तुझी दिमाखदार, लोभस, राजस रूपे विविध रंगांनी, ढंगांनी नटलेली, सजलेली. डिजिटल क्रांतीत गोठलेली, मात्र 24X7 टक्के जागी, सदैव तत्पर असलेली आणि… माणसाचं अवघं आयुष्य प्राणपणाला लावणाऱ्या, त्याला थकवणाऱ्या, आणि सतत पळायला लावणाऱ्या क्रिप्टोकरन्सी नामक आभासी चलनांनो… तुमचे चाल-चलन आता आम्हाला […]

1 10 11 12 13 14 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..