मी उशाला तुझी आठवण ठेवतो
रोज स्वप्नामधे तोच क्षण ठेवतो मी उशाला तुझी आठवण ठेवतो रोज म्हणतो तिला “हे प्रिये ! मी तुझा ” आणि त्याच्यापुढे एक “पण….” ठेवतो प्रेम म्हणजे जणू एक असतो हिरा एकजण फेकतो एकजण ठेवतो पाहिजे तर उभा जन्म देतो तुला फक्त माझ्याकडे बालपण ठेवतो सर्व नेतो लुटुन एक ‘तो’ शेवटी फक्त देहामधे ताठपण ठेवतो — महेश […]