मुके भाव
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं….१, भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची…२, भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले…..३, आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला….४, भाषेमधली शक्ती […]