नवीन लेखन...

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,  फुलून येते ज्ञान वाहण्या…..३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

ऋतूचे चक्र आणि मन

कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा   सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव   थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे […]

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।   निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता […]

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी   नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा   क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले   कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोंचीला   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां […]

शोधूं कोठें त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।   शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।   पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।   देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई […]

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।।   विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।।   देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।।   फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।   […]

1 124 125 126 127 128 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..