त्यांची शाळा
आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।। कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।। विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।। त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन […]