पंख फुटता !
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी । आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी ।।१ माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती । हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती ।।२ जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी । परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता । टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता ।। डॉ. […]