एका मनाचे हे भाग
एक विशाल मन, भाग त्याचे अनेक । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी, वेष्टण शरीराचे । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव, सारखेच असती । फरक वृत्तीमध्ये, कुणाच्याही नसती…३, अगणीत मनें, कोठे नसे फरक । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०