नवीन लेखन...

महान ग्रंथकार

दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले, ह्या जगावरती, रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती ।।१।।   धन्य जाहले वाल्मिकी व्यास, ज्यांनी ग्रंथ लिहिले, मानवातील विविधतेचे, दर्शन ते घडविले ।।२।।   विश्वामधला प्रत्येक विषय, हाताळला दोघांनी, शोधून काढण्या काही, निराळे समर्थ नाही कुणी ।।३।।   आद्य कवी वा लेखक म्हणूनी, मान तयांना आहे, अनुकरण ते त्यांचे करिता, पुष्प […]

वातावरणाची निर्मिती

वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।   आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी   विषाचा  पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविले विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा […]

रचली जाते कविता

मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची…१, शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२, शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

‘शक्ती’ हेच ईश्वरी रुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी […]

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

गुणांची परंपरा

गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची, मला वाटते परंपरा, ती चाले घराण्याची ।।१।।   रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव, प्रेमळपणे खावू घालणें, मनी तिच्या भाव ।।२।।   अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा, जुमानत नाही कुणाचाही, शाब्दीक तो वायदा ।।३।।   प्रेमळपणा असूनी अंगी, अहंकार युक्त ती, गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व, तसेच पुढे चालती ।।४।।   […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे  । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे  ।।   बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे  । निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे  ।।   कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता  । क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता  ।।   शिवीगाळ स्वभाव असतां   आदरभाव कसा […]

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा

खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ….१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही…२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून…३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे…४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर […]

प्रकाश आणि तम

प्रकाश आणि अध:कार ,  दोन बाजू  नाण्याच्या सत्व आणि तमोगुणातील शक्ती,  ठरती त्या प्रभूच्या….१ सृष्टी दिसे समोर आपल्या,  नयन ठेवूनी  उघडे अध:कार वाटे आम्हां,  त्याच मिटलेल्या डोळ्याकडे…२ जाण देई आंतून कुणी,  प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं,  कल्पना ती केवळ विचारांची…३ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 132 133 134 135 136 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..