नवीन लेखन...

खंत…

दिसत नाही मला माझं गांव जगाच्या नकाशात मला लाज वाटते त्याची मी खंतावतो… मी फिरतो जगभर धुंडाळतो नवनवी शहरं करतो वाहवाई तिथल्या सुधारणांची करतो घाई माझं गांव ‘तसं’ बनवण्याची आणि बघतो स्वप्नं निवृत्तीनंतरच्या वास्तव्याची येतो गांवात सारखे-सारखे करु लागतो बदल ‘तिथल्यासारखे’ बदलतं गांवाचं रूप काय सांगू त्याचं अप्रुप? पोस्ट करतो त्याच्या प्रकाशफिती सांगतो त्याची माहिती शहरातून […]

गाण्याच्या कलेची किंमत

एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने   तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं   मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत   भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच […]

तू ऑनलाईन आलीस की 

तू ऑनलाईन आलीस की सुचते मला कविता तू ऑफलाईन झालीस की रुसते माझी कविता तुझ्या एका रिप्लायसाठी झुरते माझी कविता तुझ्या एका  स्माईलने फुलते माझी कविता — विजय रतन गायकवाड

काहीतरी…

काहीतरी आहे असे जे तुझ्यात मुरले आंत आहे राख तू होशील तेव्हा ते जाईल म्हटले जात आहे।। तुझ्यात मुरले आंत काही वेगळेच हमखास आहे नावडो आवडो कुणालाही त्यानेच जीवन खास आहे ।। वेगळेच हमखास त्याने पोसलेला पिंड आहे तरीच ना? हरघडी नव्याने लढवतोस तू खिंड आहे।। पिंड असूदे नसूदे न्यारा ‘अंतरंग’ वेगळा आहे जगण्याच्या तुझ्या कलेला […]

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।। सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।। अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण करणे हाच […]

मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती,  मंद मंद प्रकाश देवूनी  । अंधकार भयाण असतां,  भोवताली उजेड पाडूनी…१, बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं  । असूनी ज्योत मिणमिणती,  त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२, वाटत नाहीं मूल्य कुणाला,  भरपूर पडल्या प्रकाशाचे  । मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

कवीची खंत

भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत   आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा   अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी   उदासपणे बघतो आहे     ” हाऊस फूलची ” पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी   टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते […]

 संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   […]

1 133 134 135 136 137 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..