गर्भातील अभिमन्यू
श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला, चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला, सुभद्रा झोपली असताना ।।१।। गर्भामधले तेजस्वी बाळ, ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला, वळूनी जेव्हा तो पाही ।।२।। चक्रव्यूहांत शिरावे कसे, हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी, घात तयाचा झाला ।।३।। गर्भामधला जीव देखील, जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी, सुप्तावस्थेत […]