जीवन गुलाबा परि
जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।। सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।। नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।। विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।। सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०