नवीन लेखन...

पक्षी भाषा

बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी…१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे….२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला…३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे…४, मानवप्राणी तूं एक […]

 उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

 पापाच हिशोब

वेगाने तो जात असता,  घटना एक घडली  । तुडवले गेले जीव जंतू ,  त्याच्या पाययदळी  ।। ज्ञात नव्हते कांहीं त्याला,  त्याच्या कृत्याचे  । स्वकर्मा मध्ये गुंतले होते,  एक चित्त त्याचे  ।। नजर गेली अवचित त्याची,  एका सरड्यावरती  । दगड मारूनी बळी घेतला,  असूनी अंतरावरी  ।। पापाचा बने भागीदार,  मारूनी सरड्याला  । अकारण  कृत्य जे केले,  पात्र […]

 गर्भातील आत्मा

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला, प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला ।।१।।   सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो, ‘तो’ मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।   मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे, नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।   आतां त्याचा निनाद ‘को..हं’, […]

फुले अनंताची देखणी

फुले अनंताची देखणी, मंद,मंद सुवासी,–!!! बागेत जागा खास त्यांची स्वागतां अतिथीच्या प्रारंभी, जास्वंदीचा तोरा मोठा, श्रीगणेशांचे लाडके,– ऐट त्यांची घ्या पाहुनी, प्रथम हाती धरावे नेटके, मदनबाणांची छाप विलक्षण, निसर्गाचीच किमया ती, सुवासिक, दिमाखी त्याची, लावे दुनिया विसराया खाशी, बकूळ ती फुलतांना, केवळ पहांत रहावे, सडा पडतांच अवनीवरती, जीव जसा सांडत रहावे,–!!!! गुलाबाला पाहण्या विशेष, नजर’ ती […]

तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी […]

सुप्त शक्ती

खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  । मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।। अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  । हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।। उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  । सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।। उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती […]

वाऱ्यावरती हाले डहाळी

वाऱ्यावरती हाले डहाळी, जगाची पर्वा न करत, सृष्टीच्या या साम्राज्यी, डहाळ्या अशा अगणित,— बहरलेल्या असती पानांनी, त्यामुळेच फुलेही येत, जोपासना करत त्यांची, झाडे, वृक्ष उभे राहत,—– दिनभर झळ सोसत उन्हाची, झाड तिचे रक्षण करत, जिथून फुटे हर एक डहाळी, ठेवे त्यांना अगदी अलगद,—- फळां-फुलांनी लगडलेली , मस्त -मौला दिसे डहाळी, निसर्गाचेच छोटे मूल, असूनही सतत झुके […]

 आमचे ध्येय व दिशा

कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले […]

दवबिंदुंचा थेंब पाहे

दवबिंदुंचा थेंब पाहे,प्रतिबिंब फुलाचे पाण्यात, पाणी का आरसा आहे, प्रश्न पडे त्यास मनात,–!!! रंग पाहून पाण्याचे, थेंबही भासे कसा रंगीत, विविधढंगी रूप असे, पाहून त्याचा जीव चकित,–!!! फूल कसे निडर असे, रंग त्याचे ना बदलत, पाणीच आपुले रंग बदले, प्रतिमा त्याची हृदयी ठसवत,–!!! आखीव-रेखीव पाकळ्यांचे, बाल- स्वरूप दिसे पाण्यात, थेंबात परागकण मोठाले, सारे थेंबाच्या आत डोकावत,–!!! […]

1 139 140 141 142 143 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..