नवीन लेखन...

कर्ममुक्ती

न राही तुमचे ते कर्म,  ज्यात प्रभू इच्छा अंतीम….१, प्रत्येक घटनेचे अंग,   त्यात मुख्य ईश्वरी भाग….२ तुमच्या मार्फतच होई   त्याचा इशारा कोण पाही….३, सर्व समजे मीच केले   अहंकाराने मन भरले….४, षडरिपू असे साधन   खेळविता यावे म्हणून…५, राग,लोभ, मोह मायादी   ठेवती वाटते आनंदी….६, परि याच्याच शक्तीने   प्रभू खेळ चाले युक्तीने….७, षडरिपू सारे टाळून   मुक्ती मिळेल खेळातून…..८   […]

गारवा थंडीचा

सकाळी गारवा थंडीचा किलबिलाट घुमतो पक्षांचा सखी गुथलेली कामात रुणुझुणुतो ताल पावलांचा @ शरद शहारे वेलतूर

मन अथांग सागर

मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा, मन आवर्तनी भोवरा, सखोल पाणथळाचा, –||1|| मन बिंदूंचे अवकाश, विस्तीर्ण मन पसरट, भावनांचे उठती कल्लोळ, अतुल आणि अलोट,–||2|| मन पाण्याचा डोंगर, एकावर एक पार, शुभ्रतम* भासे चढ, *निळसर पण उतार,–||3|| मन किरणी प्रभाव, झेलत साऱ्या दिनभर, सोनेरी कलत, झुकत, आभाळ उदंड त्यावर,–||4|| मन समुद्री वादळ, वारे अखंड वाहत, जीवाची नौका चालण्या, […]

आठवण

अनामिक जे होते पूर्वी,  साद प्रेमाची ऐकू आली योग्य वेळ ती येतां क्षणी,  हृदये त्यांची जूळूनी गेली शंका भीती आणि तगमग,  असंख्य भाव उमटती मनी, विजयी झाले ऋणाणू बंधन,  बांधले होते हृदयानी, उचंबळूनी दाटूनी आला,  हृदयामधला ओलावा स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा मनी वसविल्या घर करूनी,  क्षणीक सुखांच्या आठवणी जगण्यासाठी उभारी देतील,  शरीर मनाच्या […]

गांधी….आबे समजून त घ्या आंधी।

मुके बसा कायी सांगु नोका मायीत हाये आमाले। गांधी बाबा चा..किती.. पुळका हाये तुमाले। कायी सांगु नोका.. ते गांधी बाबा चे तीन माकडं। तुमचं न त्यायचं त भल्ल हाये वाकडं। बस झाले तुमचे ते सूत अन चरखे। मायीत हाये..गांधीजी किती आपले न परके। कायी सांगू नोका..की गांधीजी हात नोटावर। रोज लावता थुका… घेऊन दोन बोटावर। कायी […]

आईच्या संगत बसलो उन्हात

आईच्या संगतबसलो उन्हात, बाहेर उबेत, थंडी घरात, सकाळचा प्रहर, जीवास आराम, नाही काम धाम, बसलो निवांत, बागेच्या फाटकात, अवधान ठेवत, आईचे संरक्षण, मग काय वाण-? मला ते मिळत, मी निर्धास्त,–!!! आई बिनधास्त, नाही डरत, लोक घाबरत, मी हसत,–!!! कवडसा उन्हात, त्यात खेळत, जरासा थकत, आईस बिलगत,–!!! © हिमगौरी कर्वे

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे,  आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो,  साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती,  त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई,  कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे,  सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे ,  मागे […]

झरा वाहतो पाषाणातून

झरा वाहतो पाषाणातून, भोवती सारे खडक, निसर्गाच्या सान्निध्यात, झरणे त्याचे बेधडक, निर्धास्त तो उगमापासून, चोखाळत आपली वाट, निखळ निर्मळ निरामय,— सारखा पुढे पुढे धावत,–!!! भीती ना कुठली अंतरात, सहजी अगदी नाचत उडत कठीण त्या दगडांमधून, उत्फुल्ल होऊन मार्ग काढत, रेषा बिंदूंच्या साऱ्या रेखित, मार्गक्रमण करत ठराविक, तुषार कुठले मोती ठरत, शुभ्र पांढरे आणि सफेत, झुळुझुळु सारखा […]

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

माणसानं कसं वागावं ?

माणसाला माणुसकीचं वागणं कळावं। माणसानं कसं माणसासारखं वागावं।। माणसाचे शरीर अमोल किंमतीचं पशु-पक्ष्यांपेक्षा खूपच मोलाचं माणसाच्या हातून चांगलंच घडावं माणसानं कसं माणसासारखं वागावं।। माणसाच्या वागण्यात स्वार्थ नसावा माणसानं आचरणात बदल करावा आपल्या आचरणातून इतरांना सांगावं माणसानं कसं माणसासारखं वागावं।। माणसानं नजरेतून चांगलच पहावं चांगलच ऐकावं,चांगलच बोलावं चांगलं वाईट माणसाला कळावं माणसानं कसं माणसासारखं वागावं।। माणसानं चंचल […]

1 152 153 154 155 156 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..