जीवन प्रवासी
तुझ्या घरि आले विसंबूनी, तव प्रेमाचे पडतां बंधन सात पाऊले टाकीत टाकीत, सोपविले तव हातीं जीवन सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या तव हाती दिली घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे ह्याच जळी ऋणानुबंधाच्या ह्या गांठी, बांधल्या गेल्या पडतां भेटी जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ तो एक […]