बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)
इवलेसे लहानसे होते विश्व ते छानसे चार भिंतितले कसे ते मोरपंखी जसे।।१।। मनमानी वागायचे हवे तेव्हा उठायचे दिस कोड कौतुकाचे पिलू आई-बाबांचे।।२।। भोकाड पसरायचे लोटांगण घालायचे ढोंगी बगळा व्हायचे खोटच रडायचे।।३।। पोट दुखतं म्हणावे घरी खुशाल लोळावे आईच्या मागे फिरावे अभ्यासाला टाळावे।।४।। बालपणी रमतांना गमती आठवतांना खुप खुप हसतांना गंमत वाटतेना।।५।। सौ.माणिक शुरजोशी