नवीन लेखन...

काळजातला झंझावात

काळजातला झंझावात, उफाळत बाहेर येत, किती एक वर्षानंतर, जीव जिवास भेटत, स्मृतींची मनात ओळ, केवढेतरी अधोरेखित, दोन टिंबे एका रेषेत, रेखली करत अंत,–!!! आसूंसे भेटण्या जीव, गाली हसे नशीब, लागले करण्या हिशोब, उभे राहून करत कींव,–!!! मनातल्या मनात वादळ, दडपावे भावकल्लोळ, सामोरी येता मूर्त, थांबला वाटतो काळ,–!!!! दिवस आणखी तास, पडले केवढे अंतर, भोवती खूप वर्दळ, […]

देशभक्ती (ओवीबद्ध रचना)

हा भारत माझा देश बहू भाषा,बहू वेष इथे नांदे हृषिकेश नांदतो कल्पेश।।१।। ही शुरविरांची भुमी शौर्याची नसते कमी असे सुरक्षेची हमी भाग्यवान हो आम्ही ।।२।। ही संतांची,महंतांची पावन भुमी भक्तीची एकी विविध धर्माची झोळी भरे पुण्याची ।।३।। जे देशासाठी लढले तयांनी प्राण त्यागले अमर हुतात्मे झाले देशास्तव जन्मले।।४।। त्यांचा आदर्श ठेवूया जन उत्कर्ष साधूया जनहितार्थ वेचूया […]

हाक

दे हाक आपल्या जन्मदात्या संकटात धावून येती ते दे हात तयांना वृद्धपणी कृतकृत्य होतील नक्की ते हाक जन्मदात्यांसी सौ.माणिक शुरजोशी नाशिक

पुरी गर्वाने टम्म फुगली (बालकविता)

*पुरी गर्वाने टम्म फुगली, बशीत ऐटीत ढिम्म बसली, बासुंदीने मग तिला पाहिली, तिला कशी चटकन बुडवली*, *चिंगुराव, चिंगुराव, केवढा तुमचा तोरा, पेरू खाता चोचीने, ढंग तुमचा न्यारा*,–!!! *मनीमाऊ, मनीमाऊ टपोरे तुमचे डोळे, शेपूट आपली फिस्कारत, करता गोल वाटोळे*,–!!! *खारुताई, खारुताई, काय खाता लपवून, कोणी आले की कशा, सुळकन जातां पळून*,–!!! *वाघोबा, वाघोबा, केवढा तुमचा दरारा, नुसते […]

विरहार्त रात्र ही

विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते, भासे तीही एकटी, चमकण्यात कमी जाणवते,–!!! चेहरा तिचा उतरुनी, निस्तेज ती दिसते, का बुडाली कुणाच्या विरही, कोडे मजला वाटते,–!!! असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले, चंद्र दिसे ना कुठे जवळी, रजत किरणांचे लेऊन शेले,–!!! समूहातून दूरच उभी, अंतरी कोलाहल उठलेले, लांबूनही ती दिसते “दुःखी*, पाणी डोळां साठलेले,–!!! वाट बघे सुधाकरांची, जीव […]

आई तू माझी जननी (चारोळी)

आई तू माझी जननी वात्सल्याची मुर्ती कशी सांभाळ केला आमचा आकाशाची घार जशी…१ आकाशाची घार जशी चित्त तुझे बाळा पाशी भरवी आम्हा लापशी जेव्हा लढा आजाराशी.. २ सौ.माणिक शुरजोशी

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती ते चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक ते जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा […]

तू भासतोस जलदांसारखा..

तू भासतोस जलदांसारखा, संजीवन बरसवणारा, अविरत निष्काम सेवेला, दिनरात अंगिकारणारा, तू वाटतोस पावसासारखा, चिंब भिजवून टाकणारा, परिसरच काय, ओलेता, तनमनही धुवून काढणारा, तू असशी वाऱ्यासारखा, करारी, स्वयंभू विचरणारा, माहित नाही दिशा रस्ता, सरळ जाऊन थडकणारा, तू विस्तीर्ण समुद्रासारखा, अथांग अपार उफाळणारा, भरती-ओहोटी ना कुणाला, किंचितही घाबरणारा, तू झऱ्यागत नाचणारा , निर्मळ, अवखळ खेळणारा, सेवाव्रत निभावताना, आनंद […]

खरा तो एकची धर्म (चारोळी)

खरा तो एकची धर्म जाणा सत्कर्मातले वर्म करा आपुलाले कर्म प्रेम करणे स्वधर्म…१ प्रेम करणे स्वधर्म त्यास निस्वार्थी झालर आदरार्थी परधर्म करा त्याचाही आदर सौ.माणिक शुरजोशी

लोकशाही सत्ता हवी

लोकशाही सत्ता हवी लोकशाही राज्य भारताने स्विकारले लोकहो टिकवा हे सुराज्य इथे चालवतो पंच वार्षिक योजना नवी सत्ता ,नवा रस्ता स्विकारतो बेधुंद जनता हानीकारक देशास निर्बंधच फायदा असता हाव नको नुस्ती राजकारण्या खुर्चीची त्यास समाजसेवेची पुस्ती करू नका इथे जाळ-पोळ,दंगा-धोपा जिथे शांती लोकशाही तिथे कर्तव्य नी हक्क दिले ना संविधानाने पाळता होतील सारे थक्क सौ.माणिक शुरजोशी […]

1 159 160 161 162 163 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..