नवीन लेखन...

राधा – कृष्ण – सोल मेट्स

काळजांचे गुंफीत धागे, प्रीत आपुली जडे, कृष्णावर राधा भाळे, गोकुळास किती वावडे,–!!! सोडून मी आले , सारे घरदार अन् बाळे, सोडला संसार सारा, प्रेम केले रांगडे,–!!! कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत, तन मन माझे अनावृत्त, अनयाला ही जणू सोडले, हरीशी जेव्हा झाले अद्वैत,–!!! मन, काळीज, अंतर, हृदय, सारे काही त्यास दिले, आता, नाही काही उरले, आत्म्याने आत्म्यास […]

चरावस्था

बाल्यावस्था रम्य कसे रमतांना मौज असे सरतांना बालपण येई मना दडपण हा किशोर अवघडे कुतूहल मनी दडे नाना प्रश्न येता मनी ओथंबला तारुण्यानी तरुणाई मस्तीतली नवलाई धुंदीतली जिरे रग तरुणाची चाहुलही वार्धक्याची वार्धक्य हे विरक्तिचे अवलंबी निवृत्तीचे दुखे-खुपे भय साचे दुखण्याने वृद्ध खचे पुर्ती करा कर्तृत्वाच्या चारीवस्था महत्वाच्या सौ.माणिक शुरजोशी नाशिक

मग्न असलेले जग

मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा […]

निरांजनात मी ज्योत

निरांजनात मी ज्योत,अखंड सारखी तेवत, पुढे माझा भगवंत, नतमस्तक मी राहत,–!!! मी समईतील वात, झिजत राहते सतत, चाल माझी मंद-मंद, उजेडाचे रक्षण करत,–!!! मी पणतीतील ज्योत, मंद तरीही ठळक, तमाला मात देत, सर्वांना मार्ग दाखवत,–!!! चिमणीतली मी ज्योत, इवलीशी पण काम करत, धीमी – धीमी प्रकाशत, भोवताल थोडा दाखवत,–!!! मी घरातली लेक, वाढले लाडांकोडांत, तेज माझे […]

शेतकरी राजा

शेतकरी राजा आहे जगाचा आधार भुकेचा भार त्याच्यावरी ….. १ पुण्यवान राजा खळगी भरवी पोटाची सार्‍या जगताची एकटाच ….. २ गाळूनी घाम त्यानं फुलवलं रानं पिकविलं सोनं शेतामध्ये …. ३ शेताच्या बांधाला खातो चटणी भाकर लागते साखर घामामध्ये ….४ धरणीचा लेक करी काळ्याईची सेवा पिकवितो मेवा जगासाठी. …. ५ करी परोपकार ह्या सार्‍या जगावरी स्वर्ग भूवरी […]

विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू

विश्व केवढे थोरले, मानव केवढासा बिंदू , तो तर केवळ एक थेंब ब्रम्हांड सारे मोठा सिंधू ,–!!! असे असता गर्व करी, नको इतका अहंकार करी, हातात नाही काही तरी, उगीचच मिशीवर ताव मारी,–!! मेंदू केवढा, बुद्धी केवढी, आचार-विचार मात्र वेगळे, संस्कारांच्या नावाखाली, पोकळ बढाया मारती सगळे,–! हातात नाहीत पुढचे क्षण , काय घडेल त्याचा नेमच नाही, […]

हलके-फुलके

असे असो,– तसे नसो,बातां त्या केवढ्या,–? मग ना तिन्ही त्रिकाळ, गप्पांच्याच रेवड्या, –!!! कुणी शेखचिल्ली येतो, कशा मारीत पोकळ बढाया, कृतिशून्य त्याच्या वागण्यात, केवळ थापा लोणकढ्या–!!!, असे करतो,– तसे करतो, किती असती फुशारक्या, सतत बाकीचे वाट पाहत, याचा अत्तराशिवाय फाया,–!!! कर्तृत्व मी गाजवतो, भूलथापाच उधाणत्या, येता सामोरी तसे आव्हान, पळतो मागे लावून पाया,–!!! संकटांना तोंड देतो, […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।।   कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।।   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  […]

विसरून साऱ्या ताणतणावां

विसरून साऱ्या ताणतणावां ,देवा तुझ्या कुशीत यावे, करून निश्चिंत आपुल्या मनां, वरूनच पृथ्वीला बघावे,–!!! कलंदर वावरणाऱ्या ढगां, सोबत घेत दूरवर हिंडावे, चहूकडे अन् चहूदिशांना, आनंदाने गात फिरावे,–!!! ताऱ्यांसवे फेर धरतां, गगनाला मुठीत घ्यावे, पिऊन आधी रजतकणां, धरणीकडे अभिमानें बघावे,–!!! नकोत भय भीती चिंता, विद्युतलतेसह हिंडावे, कुणी कुठे दहशत माजवतां, लख्खकन कसे चमकून उठावे,-! पाहण्या सूर्य चंद्राला, […]

दूरवर गगनी उडत निघाली…

पक्ष्याचे एक लहानसे पिल्लू आपल्या आईशी बोलत आहे अशी कल्पना करून,—-!!!! दूरवर गगनी उडत निघाली, सगळ्या पक्षांची माला, आई, झुंजूमुंजू झाल्यावरती, उडू दे ग लांब मला,—!!! त्यांच्यासवे फिरेन आकाशी, पाहेन रंगीबेरंगी दुनिया, होईन मग मी खूप आनंदी, विशाल उंच आभाळात या,–!!! निळ्या काळ्या ढगांवरती, कसे स्वार होऊनिया, पक्षी सारे माग काढती, उंच गगनात जाऊन या,–!!! आपले […]

1 160 161 162 163 164 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..