नवीन लेखन...

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे

ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत, गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,–!!! केवढे त्यांचे गारुड हे, अंतरीची खूण पटत, त्यांच्यापुढे आपण केवढे, सिंधुतील अगदी बिंदूगत,–!!! प्रखर त्यांचे तेज असे , भुरळ पाडे चमचम चमक, हरेक कर्तव्यकठोर असे, असे प्रत्येकजण बिनचूक,–!!! आपली जागा ठाऊक असे, राहती किती स्थितप्रज्ञ , अवकाश केवढे मोठे, धीराने त्यास तोंड देत,–!!! प्रवास, दिशा, […]

आनंदाच्या हिंदोळ्यावर (लावणी)

आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलते साल नवं नवं राजसा प्रीत पाखरांचे उडवा हो तुम्ही थवं ।।धृ।। नव्या सालातील नवी सांज ,नटून बसले हो मी।। अजून सजणा नाही आले,घायाळ हरणी हो मी।। उगाच कावं उशीर केला,मनास या होती घावं।। राजसा प्रीत पाखरांचे,उडवा हो तुम्ही थवं।।१।। साज सरली रात्र झाली, भेटीलागी मी आतुरली।। विरहणीची व्यथा न्यारी, अजून तुम्हा ना कळली […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  घरटे बांधून गेल्या त्या खेळूनी नाचूनी उड्या मारूनी,  चिव चिव करित गात होत्या झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवीती हलके हलके दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके संसार चक्र ते भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे सोडूनी अल्प […]

जन्मभूमीपासून दूर, मातृभूपासून वंचित

जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित, लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,—!!! उठे स्मृतींचे मोहळ, स्मरणांच्या माशा डंसत, भारतीय म्हणून मी,—- झुरतो तिच्यासाठी अविरत,—!!! थांबे ना कुणासाठी काळ , मागेमागे धावे मन, आलो जेव्हा परदेशात, उदास होतो आत उरांत,—!!!! खडी करण्या कारकीर्द, मनात होती खूप उमेद, आईपासून तुटले मूल , सारखी जिवा वाटत खंत,–!!! नीतिमंत तो भारतीय , असे […]

महानायिका

हो!!!! हो मी महानायिका बोलतेय नाव माझे सावित्रीबाई माझी जन्मदात्री लक्ष्मीआई ३जानेवारीला सुदिन उगवला खन्दोजी नेवसे यांच्याघरी कन्यारत्नास “पहिली धनाची पेटी”चा मान मिळाला. आजच्या सारखा गर्भपाताचा शाप नाही मिळाला. हो !!!!!!! हो मी महानायिका बोलतेय उपवर होताच १८४०सात ज्योतिरावांच्या घरचा उंबरठा ओलांडला. संरक्षक,समर्थक गुरू लाभता साक्षरतेचा वसा घेतला. हो!!!! हो मी महानायिका बोलतेय मी तर ज्ञानदानाचा […]

तारकापुंजाची ताराराणी

तारकापुंजाची ताराराणी, ऐकते तुझे मनोगत, कथा व्यथा सारी कहाणी, समजते ग मज नकळत, –!!! रंग तुझा चमकदार, दुधी, पसरत नभी मंद प्रकाश, उजळतेस कशी आकाशी स्वयंप्रकाशी झगमग झगमग,–! चंद्रराजाच्या जनानखानी, अस्तित्व कसे तुझे ठळक, किती राण्या असून भोवताली, तुझ्यावर त्याची मेहरनजर ,–!!! तरीही भासशी किती एकाकी, काय सोसशी अंतरी दुःख, तोंड मिटुनी गप्प राहशी, कधी लपवत […]

फांदीवरती बसलो मी

फांदीवरती बसलो मी, पिसारा आपला जुळवुनी, बघतो साऱ्या सृष्टीला, एकवार पुन्हा निरखुनी,—!!! हिरव्यागार या रानी, मजला दिसे समृद्धी, जीवन इथेच रमुनी जाई, शांतता वाटे अंत:करणी,–!!! भाईबंदांच्या येतां आठवणी, मन जाते कसे हेलावुनी, कोण कुठल्या दिशेला नेला, निष्ठुर या माणसांनी,–!!! सौंदर्याचे जिवंत दाखले, कैद ते का असे करिती,–? आम्ही तर लेकरे निसर्गाची, मग शाप आमुचे भोगती,–!!! स्वातंत्र्याची […]

नववर्ष (हायकू)

*हायकू* नववर्ष *१* सु स्वागतम् द्वि सहस्त्र वीसात हो सुफलाम् *२* गरुड झेप घे या नव वर्षात दे स्वर्ण लेप *३* सुर जुळावे तन-मन-धनाचे सुख लाभावे *४* प्रभा फाकता कलरव हो झाला वर्ष -स्वागता *५* या पायघड्या घालते रे स्वागता आता ये गड्या *६* झाले स्वागत मोहरता लेखणी नव वर्षात — सौ.माणिक शुरजोशी

 देह देव

हाडे, मांस, रक्ताने शरीर बनविले छान सौंदर्य खुलते त्या देहाचे जर असेल तेथे प्राण   प्राण नसे कुणी दुजा हा परि आत्मा हेची अंग विश्वाचा जो चालक त्या परमात्म्याचा भाग   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं प्रेमभरे देह भजावा अंतर बाह्य शुद्धता राखित समर्पणाचा भाव असावा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

उघडेल कधी दरवाजा

उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल, संपतील तणाव चिंता, स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, —- मोल देत कसा नाचेल , भरारी घेत आभाळा, उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना, सतत रुंजी घालत राहील,— इवल्याशा त्याच्या मनात, *मुक्तीचा आनंद भरेल, विश्वास ठेवू तरी कसा, मनी भावना उफांळेल,— सुटली ही भयानक कारा ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां, […]

1 162 163 164 165 166 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..