नवीन लेखन...

प्रकाश फुलं

लयबद्ध चमचमाट अग्निशिखांचा।। रात्रीच्या गर्भातला प्रकाशित फुलांचा।। लोभसवाणी उतरली तारकादळे।। सोहळा फुलविती अंधाऱ्या अवसेचा।।१।। चंदेरी दुनिया लखलख तेजाची।। भूवरी भंडारदऱ्यास शोभा स्वर्गाची।। चला पाहूया मौज सरत्या वैशाखाची।। ही विलोभनिय दृश्य प्रकाशफुलांची।।२।। किर्र रात्री,धडपड निसर्ग प्रेमींची।। इवल्या काजव्यांचे नर्तन बघण्याची।। वाढताच संख्या अशा सोन किटकांची।। सांगता मान्सून येताच मयसभेची।।३।। — सौ.माणिक शुरजोशी

सुवास (चारोळी)

शेलकाव्य रचना – वर्ण ८ विषय – सुवास मज आवडे सुवास सुवास रातराणीचा ही दरवळते रात्री रात्री बाग सुगंधाचा — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

देवा तुझे द्वार (चारोळी)

काव्याक्ष चारोळी देवा तुझे द्वार असे भक्तीचा सागर येऊन करी स्तुती जागर तिथे तू असशी का तारणहार? — सौ.माणिक शुरजोशी ७/१२/१९

अपेक्षांचा डोंगर (मुक्तछंद)

अपेक्षांचा डोंगर वाढतच जातो त्या मागे माणूस धावतच राहतो अपेक्षांचा ओघ वाहवत असतो कुठेतरी विश्राम द्यायचा असतो आणि ……….. इथच चुकतं,नव्वद टक्के मार्कस् मिळाले आई म्हणे बाळा थोडा अभ्यास केला असतास तर…… तर नक्कीच वाढले असते टक्के पाच लाखाचं पॅकेज अमुक कंपनी जास्त देईल पॅकेज तृप्ती नाहीच…….. अपेक्षांचा नाही….. तृप्तीचा डोंगर वाढू दे प्रयत्न सोडू नको […]

सान पोर

बाल वय कष्टमय ढिगाऱ्यात झुरतय माय जाते कामावर तिच्या मागे जाई पोर वितभर या पोटाची चिंता असे या आईची कष्टकरी गाळी घाम तेव्हा मिळे थोडा दाम गरिबाची रित न्यारी जगण्याची ओढ भारी जिथे तिथे खडकहे विरंगुळा लेकीस हे दगडात आनंदी ती बघताच सुन्न मती — सौ.माणिक शुरजोशी

जाणीव…

आयुष्यात काही लोकांना एक जाणीव करून देना खूप महत्वाचे असते…. कि त्यांच्या असण्याने काही फरक नाही पडत, तेव्हा त्यांच्या नसण्याने तर कदापिही फरक पडणार नाही….!! — मयुरी राम विखे

मराठमोळे सौंदर्य तुझे

प्रख्यात अभिनेत्री “स्मिता पाटील”, यांचा काल स्मृतिदिन झाला त्यानिमित्त,—!!! मराठमोळे सौंदर्य तुझे, टपोरे हसरे डोळे, चेहऱ्यावरती भाव झरती, आविर्भावही बोलके ,–!!! चाफेकळी नाक तुझे, सामान्यातील नायिका तू , अवघ्याच स्त्रीजातीला, अभिमानास्पद वाटलीस तू ,–!!! अभिनयातील शिखर गाठले, कर्तृत्वाने आगळे वेगळे, सामाजिक भान जपले, ते तर आणखी निराळे,–!!! स्त्रीत्वाच्या अस्मिता सगळ्या, नारी तितक्या परि,-साकारल्या , असामान्य कलेनेच […]

माझिया माहेराची नागमोडी वाट (भावगीत)

माझिया माहेराची नागमोडी वाट जाई चढत चढत खंडाळा घाट।।धृ।। निसर्ग कुशीत दडलं माहेर गं हिरवी हिरवाई सभोवताली गं तिथे थाटला पोहळी बनाचा थाट जाते चढत चढत खंडाळा घाट।।१।। माझे माहेर आहे बाई तालेवार दिमतीला सदोदित नोकर चार बंगळीस आहे पहा चांदीचा पाट जाते चढत चढत खंडाळा घाट।।२।। माय माऊली माझी उभी स्वागताला वहिनीसवे माझा बंधूराया आला […]

सुख दु:खाचे चक्र

कळप   सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे…१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती…२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करिते….३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी….४ लगेच अनूभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा…५, पूनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख….६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी…७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती […]

खरच सांगते (हास्य कविता)

मला एकदातरी मंत्री करा हो खरच सांगते आश्वासनांच टॉनिक पाजून प्रजा सारी निरोगी करते मला एकदा तरी शिक्षणमंत्री करा हो एक एक अकरा म्हणून गणित साऱ्यांचं पक्क करते. मला एकदा अर्थमंत्री करा हो खरच सांगते कर्जाचा डोंगर उभा करून पुढील येणाऱ्या सरकारला फेडायला सांगते मला एकदा गृहमंत्री कराच हो खरं सांगते घरगुती भांडण चव्हाट्यावर मांडून केलेली […]

1 167 168 169 170 171 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..