ओसाड जमीन
ब्रिटीश कवी T. S.Eliot यांच्या Waste Land या कवितेने प्रेरित होऊन मी लिहलेली ओसाड जमीन ही कविता कित्येक गढूळ लोंढे प्रत्येक ऋतूत शहराच्या गल्लीबोळात शिरतात रिकाम्या निर्जन शांततेच्या सागरात चेहरा नसलेली धक्का खात फिरतात पेरणी करून अथवा तरव्यासाठी कोवळं पेटवूनही येथे प्रेतांना धुमारे फुटतच नाहीत खाली मान घालून अंत्ययात्रेत सुतक पाळणारे एकमेकांना ओळखू येतीलच असे नाहीत […]