प्रश्नोत्तर चारोळी
प्रश्न जय कशाला म्हणतात हो? उत्तर कुणी देणार का? प्रतिस्पर्धि होता पराजित त्यालाच जय म्हणावे का? उत्तर आपला हक्क हस्तगत करणे आक्रमकाला समज देणे नाहीच येता समज,पराभूत करणे अशी जयाची परिभाषा करणे सौ.माणिक (रुबी)
प्रश्न जय कशाला म्हणतात हो? उत्तर कुणी देणार का? प्रतिस्पर्धि होता पराजित त्यालाच जय म्हणावे का? उत्तर आपला हक्क हस्तगत करणे आक्रमकाला समज देणे नाहीच येता समज,पराभूत करणे अशी जयाची परिभाषा करणे सौ.माणिक (रुबी)
कहाणी तारुण्याची तुझ्या माझ्या प्रितीची अलगद मिठीची ओढ सहवासाची।।१।। स्वप्ने सुखी संसाराची तुझ्या नी माझ्या प्रेमाची धुंदी असे जवानीची चिंता नाही भविष्याची।।२।। चल दुर जाऊ एकांतात हितगुज साधू आपसात हातात गुंफूनी आपले हात चल जाऊ घरी झाली सांजवात।।३।। हा गजरा मलाच राहू दे तनस्पर्श तुझा दरवळू दे सुवासातला मादछक सहवास दे नित्य जवळी असा वास असू […]
दिसभर उकाडा हा कुणासही सोसवेना त्यावर फुंखर म्हणून का केशरी चंद्राच्या दुधाळ चांदण्यांची शितलता… आश्विन पोर्णिमेसी वाढली निरभ्रता,सवे पिठूर चांदण्यांची मोहीनी मनाला…. अंबाबाईचा उत्सव जोडीला भुलाबाईचा जागर शिव-पार्वतिचा संगम… झाला दिवस लहान,आता होई रात्र महान त्या रात्रीला ओवाळण्यास दिपावली आली सत्वर… शरदाचे हे दिवस सुगीचे शेतकरी राजा सुखी शय्येवरी आरामात निजे…. सौ.माणिक (रुबी)
साखर ही नित्य खावी जिवनाला गोडी लावी चव टाका साखरेची लज्जत ही पदार्थाची जोडीलाही मीठ हवे स्वयंपाकी अन्ना सवे मीठ घाला चव येई अणू रेणू मान घेई ताजी मेथी खावी सदा नित्य तिच्या खुप अदा या मेथीची उसळही छान होई पौष्टीकही न्यारी मजा तुरटीची आवडही शुद्धतेची गाळ खाली बसविला फिरवता तुरटीला कारल्याचे करा कापं खाती सारे […]
मनाच्या हळुवार तारा……. आज छेडील्या कोणी जरा। तशी बावरले मी मोहरले मी ……..सूर नवे जागले।।१।। झुळुक सुरांची आली……… गोड सुखाची बरसात झाली। अंकुरली प्रीत ओलेत्या मातीत ……..मलाही ना कळले।।२।। हुंकारलीे ती मनात………….. जीव आसावला आत आत। वेगळी जाणीव नुरली उणीव …….स्वप्नच आकारले।।३।। स्वप्नाची भूल धुसर….. दिसे प्रेमाचे गांव सुंदर। मागे मागे जशी चालले मी अशी ………….लगबगी […]
मुक्तछंद उगवतिचा सुर्य मज वाटतो एक गेंद टोलवावा उंच नभात हीच प्रबळ मनिषा मनात सागर किनारी प्रभातवेळी उगवतो हा पुर्वेला भल्या भल्यांना मोहवितो खट्याळ आहे जरा चित्रकार येती जाती असंख्य चित्र रेखाटती; मधेच येई छाया चित्रकारही छबी खेचतो हजारदा प्रेमी युगले इथेच येती गुज मनीचे सांगण्यास प्रेमाच्या आणा भाका देती तुझ्याच साक्षीने दिनकरा साधूसंतही कितीक येती […]
पुर्ण झाली ज्ञानेश्वरी वाङ् मयी यज्ञ करी विश्वात्मक तुम्ही देवा प्रसादाचा द्यावा मेवा नाथ माझा हा निवृत्ती सद्गुरु करी तृप्ती दुष्टपण सुटावेच मैत्रीस्तव सत्कर्मेच तम,पाप नष्ट होवो सर्वामुखी घास जावो त्रय गुणी बाधा नको षड् रिपू देवा नको ईश निष्ठ समुदाय मांगल्याची असे माय ज्ञानदिप प्रकाशिले आचरण शुद्ध झाले सज्जन हे कल्पतरू चिंतामणी गाव जणू संतजन […]
वर्षानुवर्षे आम्ही संघर्षच करतोय पुढाऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवतोय —- उद्योग धंद्यावर मंदीचे सावट आहे त्याच रोजगारात घट हाताला काम नाही बेकारांचा आकडा फुगतोय वास्तवाचं भान हरवलेला तरुण आजही उद्याच्या आश्वासनांना भूलतोय दोन कोटी रोजगाराचा शब्द मेघा भरतीवर टळतोय ——– दुनियेचा पोशिंदा मुठीने पेरून रास उभारतो विस्कटता पुन्हा सावरतो भाव मिळेल औन्दा सोन्याचं पीक कवडीमोल विकतोय आजही […]
आहे ती लहान परि किर्ती महान छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहीण्यासाठी लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर शिक्षक झाले कुणी […]
सह्यगिरीच्या डोंगररांगा हिरवाईने नटून बहरल्या | रंगबिरंगी रानफुले गोजिरी भाळावरती त्यांनी माळीली | संततधारा शिरी बरसात होत्या मेघातुनी अलवारश्या रेषा | झाकोळून गर्द रंग हा गहिरा घननीळ नभातच मिसळून गेला | वेध लागले सहस्त्ररश्मीला कधी पाहतो शृंगार धरेचा | हळूच बाजूला करुनी ढगांना थोपविल्या त्या झरझर धारा | अलगद पसरली रवी किरणेही सोन पाऊली धरणीवर उतरली | […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions