मायेचा बाप
मायेचा बाप कष्टकऱ्या धाप आम्हाला सुखी माप….१ कर्तव्य फार शिस्तिला हो धार लळा अपरंपार…….२ घराचे छत गावात ही पत उद्योगी पारंगत…….३ खर्च मोजून जावक योजून हौस भरभरून…….४ समसमान वागवतो छान शिकविण्यास रान…..५ अबोल फार महान विचार झाला नाही लाचार….६ करू सन्मान सदा असो भान घरादाराची शान…..७ हा ताणा बाणा भाव मनी जाणा हा संसाराचा कणा….८ — […]