नवीन लेखन...

वेध गुलाबी थंडीचे

वेध गुलाबी थंडीचे पेटे शेकोटी रात्रीची फड रंगती गप्पांचे पार्टी असते हुर्ड्याची….१ पडे चांदणे रात्रीचे चंद्र निरभ्र आकाशी गुज सांगते मनीचे सखी ही प्रियकराशी….२ उब वाढता तनाची सय घालतो सखीसी आस असे मिलनाची आवतण रजईसी……. ३ निशा अंधाऱ्या रात्रीची साथ मिळे गारव्याची जादू रती-मदनाची प्रित खुले युगलांची……. ४ दिस आले प्रणयाचे रिते चषक मद्याचे वेध गुलाबी […]

सासरची आठवण

ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या […]

अग्ग बाई!

अग्ग बाई!! सास्सु बाई सदा त्यांना अस्से घाई ओsss!अरेच्चा! पहा पहा आधुनिक पोषाख हा अय्यो गडे! इश्श गडे! माझ्झी सासू पहा गडे! त्यांना तुम्ही हसू नका नाव मुळी ठेवू नका अय्यो रामा! म्हणू नका अभ्यासू त्या ज्ञान ऐका ज्ञानपिठ पुरस्कार त्यांना मिळे मान थोर छंद त्यांचा ओssss!बघा ना पुस्तकांचा हा खजिना नम्र अति त्या आहेत हो!मी […]

सव्वीस नोव्हेंबर

काळ रात्र ठरे ही सव्वीस नोव्हेंबर देश रक्षण्या वीर तो मरे//१// होता भ्याड हल्ला घुसले हो अतिरेकी नाहक या ताजवरी डल्ला//२// घे बळी नाहक क्षण हा कर्दनकाळ कुठे फेडती असे पातक//३// ठाकले सैनिक मावळे हे शुर वीर महाराष्ट्राचे हेच पाईक //४// दोन दिस झाले ओलीस ठेवती सारे परि नच सैनिक थकले//५// शहीद होऊनी शत्रूसी पाणी पाजले […]

या वळणावर

या वळणावर खुप हुंदडलो बहुत बागडलो मनमानी जगलो लाडाकोडात वाढलो *बालपण* या वळणावर थोडा शिस्तिचा बडगा झालो थोडा मी कोडगा अभ्यासाचा असे तगादा काय करू आता सांगा *कौमार्यपण* या वळणावर मौज मस्ती व्याख्या बदलली यौवनाची नशा चढली स्वतंत्रतेची बाधा जडली *तारुण्यपण* या वळणावर सारी नशा उतरली लग्नबेडी पायी आली संसारी खेळी चालली जबाबदारीने कंबरडे वाकली *प्रौढपण* […]

दिवेलागण

ही सायंकाळ ती खग माळ उंच उडते सांज सकाळ पश्चिम वात उधळी रात हा सुखावतो मनामनात येता घरात ही तेलवात दिवेलागण या देव्हाऱ्यात दिवा लावला तम सरला शुभंकरोती नाद घुमला वृंदावनाशी दिप लावशी नित्य घरात लक्ष्मी वसशी — सौ.माणिक शुरजोशी नाशिक

सुरमयी गीत गाऊ – भावगीत

सुरमयी गीत गाऊ,चल आज प्रीतीत नाहू चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।धृ।। तुझ्या सवे निशा ढळे, धुंद पहाट वात येई तिथे माझ्या मिठीत, येशिल का? मिठीत येऊनी, स्वप्ननगरी रत होऊ चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी तिथेच राहू।।१।। भाव तुझे मनातील,हलकेच वदशील का? भावसुमांची महफिल ,तिथेच छान भरेल का? प्रीतीचा गंध नवा,चल चौफेर उधळू चल प्रेममयी गाव पाहू,जाऊनी […]

जरा धीर ठेव

ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं  ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई  ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा मोबदला मिळेल तुजला योग्य प्रयत्नाचा  ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दत्तात बुडून

व्यापुनी राहावा श्रीदत्त सतत माझिया श्वासात नाम रुपे हृदयी वसावा स्पंदनात दत्त रक्त कनिकात एकएक डोळ्यांनी पाहावा दत्तची सुंदर आत नि बाहेर भरलेला कानांनी ऐकावा रव दत्त दत्त अणुरेणूत साठलेला अवघाचि व्हावा रस रंग गंध स्वतः अवधुत मजसाठी विक्रांत वहावा घट हा भरुन दत्तात बुडून तनमन © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

अर्थशास्त्र

कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला। कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥ सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला । धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना। नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।। जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे। सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे। गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।। राजनितीचे सुत्र नवे मग […]

1 173 174 175 176 177 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..