नवीन लेखन...

खेचून मिळवा

तो तर देत नसतो कांहीं, घ्यावे लागते खेचूनी  । शक्ती लावूनी खेचा सारे, देईल परि ढील सोडूनी  ।। जरी असला दयेचा सागर, केवळ मागणें मान्य नसे  । तुटून तुमचे प्रयत्न होता, ओजळीने तो देत दिसे  ।। व्यर्थ घालवी जीवन कांही, स्वार्थीपणाच्या मागणी पायी  । वेडे ठराल तुम्हींच परि, काळ मात्र कधी थांबत नाही  ।। धडपड करा, […]

क्षणभर थांबतो का?

क्षणभर थांबतो का? क्षणमात्र उशीर हा क्षमाशिल असतात साधुसंत जगतात क्षण क्षण वेचतात या क्षणिक जिवनात ज्ञानदान करतात ज्ञानदाता जिवनात ज्ञानेश्वरी ज्ञानामृत ज्ञानार्थि हे हो संतृप्त ज्ञात सारे असावेच विज्ञानात शोधावेच त्रस्त होती मतदाते व्यस्त होता सत्ता भोक्ते त्राहि त्राहि जनता रे नेता पाही स्वहित रे त्राता नाही जनतेचा नेता कोणी या राष्ट्राचा — सौ.माणिक शुरजोशी […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे….. बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने…. निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती… लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता छंद लागूनी नशाच […]

ना घर का ना घाट का

मारल्या मोठ्या मोठ्या बाता मतदार राजा भुलला भुलला भारतिय जनता पक्ष म्हणाला “मै यु करूंगा,त्यू करूंगा” ओढली साऱ्याच पक्षांनी याचीच री… फरक थोड्या दोन-चार शब्दांचा “भुतो न भविष्यती” ऐसा काहीसा चमत्कार झाला वाघावर स्वार व्हायला कमळ राजी झाला “काय तुझ्या मनात,सांग माझ्या कानात” गुज-गोष्टीचा डाव नाहीच रंगला फिफ्टी -फिफ्टीचा मामला नाही कुणास रुचला एकमेकांवर कुरघोडी करतांना […]

झुरते तुझ्या विना

झुरते तुझ्या विना ये काव्य सरिता पुन्हा या सुंदर लेखणीविना ना फुटणार पान्हा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्य दरबारी आले पुन्हा सेवा घडणार नाही विद्येविना लाभ घडो तुझा पुन्हा झुरते तुझ्या विना साहित्यिक प्रवासी होणार पुन्हा निरंतर वाचना विना साहित्यिक निर्मिती ना घडणार पुन्हा घडणार पुन्हा — सौ. माणिक शुरजोशी

माणूस आणि सुगंध

माणसाचे व सुगंधाचे एक अतूट नाते असावे त्याच्याच जीवनगाणे खुशाल असावे ।।धृ।। सुगंध…. माणसाला हवाहवासा वाटणारा आपल्याच मस्तीत वावरणारा घ्यावा तितका कमीच वाटणारा एकांतातही आसपास दरवळणारा सुगंध…. आयुष्याच्या वाटेवरील सुख-दुःखाचा झरा मोर-लांडोरीच्या बेधुंद नर्तकीचा पिसारा फुलांच्या कोमल त्वचेच्या आठवणी जपविणारा निसर्ग आणि नात्यांची मखमली वाढविणारा सुगंध…. माणसाचे मन सैरावैरा पळविणारा निसर्गाशी बांधून ठेवणारा दुखणी विसरायला लावणारा […]

खरी स्थिती

मला नाही मान मला नाही अपमान, हेच तूं जाण तत्व जीवनाचे….१ कुणी नाही सबळ कुणी नसे दुर्बल हा मनाचा खेळ तुमच्या असे….२ कुणी नाही मोठा कुणी नसे छोटा प्रभूच्या ह्या वाटा सारख्याच असती….३ विविधता दिसे ती कृत्रिम असे निसर्गाची नसे ती वस्तूस्थिती….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

दिस कलतीला आल्यावर

दिस कलतीला आल्यावर ओढ लागते घराची माय बाप पोरं ढोर आसेसुन असतात कवाची येणार बा, येणार मा तोंडात साय दुधाची उरफाट जग हाय उलघाल उराची थांब जरासा पुरा कर झाली का येल केकावतो लमंढीचा म्हणतो फुकाचा तेल — शरद शहारे, वेलतूर

सुखाच्या सरींनी मन हे बावरे

सुखाच्या सरींनी मन हे बावरे किती प्रेमळ माझा बाप रे वळणा वळणावर साथ त्याचीच रे भविष्यातिल संकंटांना मिळो तुझीच ढाल रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे आईच्या प्रेमळ छायेत वाढले रे सुसंस्कारीत मन माझे घडविले रे समाजात वावरतांना तिने मला जपले रे सुखाच्या सरींनी मन हे बावरे सख्या तुझ्या संगतित मी बेभान रे झुलवतोस सुखी झुल्यावर […]

1 174 175 176 177 178 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..