नवीन लेखन...

लाडक्या नातीस

जन्मापासूनी बघतो तूला परि जन्मापूर्विच ओळखले रोप लावले बागेमध्ये फूल तयाने दिले   चमकत होती नभांत तेंव्हा एक चांदणी म्हणूनी दिवसाही मिळावा सहवास हीच आशा मनी   तीच चमकती गोरी कांती तसेच लुकलुकणे मध्येच बघते मिश्कीलतेने हासणे रडणे आणि फुलणे   चांदणीचा सहवास होता केवळ रात्रीसाठी दिवस उजाडतां निघून गेली आठवणी ठेवून पाठी   नको जाऊस […]

तिचा पहिला नंबर

आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  […]

मोहरली ही अवनी

ग्रीष्माच्या काहिलीने आसमंत तप्त झाला अति उष्णतेने धारित्रीस कासावीस करून गेला ।। 1 ।। भेगाळलेल्या जमिनी आणि बंद पडलेली मोट नाही आला पाऊस तर कसं भरेल पोट? ।। 2 ।। प्रत्येक जण प्रतीक्षेत कधी येईल पाऊस डोळ्यांतून पाणी येईपर्यंत नको वाट बघायला लावूस ।। 3 ।। पाण्याविना तडफडत होते पशू, पक्षी, मानव मग तो प्रासाद असो, […]

श्री कृष्णाच्या हातांतील जादू

हे घनश्यामा श्रीकृष्णा कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   ।।धृ।।   बोटे फिरवूनी मुरलीवरी सप्तसुरांची वर्षा करी सर्वा नाचवी तालावरी रंगून जाती हे श्रीहरी बोटांमधली किमया तुझी,    नाहीं कळली कुणा   ।।१।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   बोटांत बोटे गुंतवी राधेला तूं नाचवी गोपींना तूं गुंगवी गोपांना तू खेळवी कशी लागते ओढ तुझी,   […]

महाकवी दुःखाचा – To The Beloved GRACE

किती गोड आणि किती गूढ भाषा जशी चांदण्यांची नभीं राऊळे  किती खोल अशी किती भूल पाडी  तुझी शब्दगंधा, तिचे सोहळे    असे काव्य जेथे व्यथा भरजरी  किती दुःख आणि किती वेदना  असा रौद्र शृंगार हा भावनांचा  जिथे नांदते ही जुनी वंचना    तुझी सांज प्यारी तुझ्या चंद्रखुणा  तुझ्या काव्यभाषेत डोकावती  अक्षरांतूनी अर्थ जिथे वाहतो  तिथे भव्य […]

गोठ

ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते ! इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!! हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके, झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!! कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले, ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले […]

 निती मूल्ये विसरला

विसरलास तू मानव पुत्रा, नीतिमूल्ये सगळी, काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली….।। धृ ।।   स्वप्नामध्ये दिले वचन, पाळीले ते राज्य घालवून, हरिश्चद्रांची कथा आजही करीते मान ताठ आपुली….१, विसरला तू मानव पुत्रा  नीतिमूल्ये सगळी,   राजा साठी देई प्राण, दुजासाठी होते जीवन, ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी शिवरायाची शान राखली….२, विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये […]

थवा राव्यांचा

सकाळच्या या प्रसन्न प्रहरी सूर्यकिरण पसरले अंबरी ।। उदर भरण करण्यासाठी लगबग उडाली ही पक्ष्यांची ।। कावळे, घारी, साळुंखी ही पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।। प्रत्येकाचा सूर निराळा गाऊन सवंगड्या साद घालती ।। पटकन आला थवा राव्यांचा मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।। घाणेरीच्या झुडुपांमध्ये क्षणात हा मिसळून गेला ।। मोबाईल हा गप्प बसेना मग नजारा हा […]

नशिब

नाही मज मायबाप नसे कुठे घरदार घर हे अनाथालय होतो उकीरड्यावर ।।१।। आता बघा झालो मोठा वावरतो समाजात विचारता जन्मदाता प्रश्न हे अनुत्तरीत ।।२।। थोर नशिबाचे फेरे छत्र खंबीर लाभले इथे वाढलो घडलो नाही काही बिघडले ।।३।। बद्धि अचाट अफाट माझे कवच कुडलं तिच्या जोरावर आज उच्च स्थान मिळवलं ।।४।। बळी कुमारीमातेचा शाप भोगतो जनाचा चेष्टा […]

सांजसावल्या….

सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। पाहुनीया मोहक रंगछटा मनमोराचा फुले पिसारा किती साठवू नयनी नजारा वाटे ढगांवर पसरला पारा ।।१।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। डोहात नदीच्या चमके धारा लाटांवर खेळे अवखळ वारा काठावर उभा निष्पर्ण वृक्ष हा आकाशातून आला फिरवून खराटा ।।२।। सायंकाळी क्षितिजावरती पहा पसरल्या सांजसावल्या ।। एकत्र पाहुनी हा देखावा मज […]

1 176 177 178 179 180 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..