नवीन लेखन...

नाम मार्ग

ईश्वर आहे नामांत परि,  नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।। असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।। आठवणीतच तो लपला आहे,  दिसत नाही कुणा  । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।। रंग रूप आणि आकार देणे,  असते सोई साठी  । एकाग्र […]

माझे पणाची जाणीव

एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]

गुज सांगती

झाडा वरल्या खोप्या मधल्या गुज सांगती पिला आपल्या…. १ चारा खाऊनी पाणी पिऊनी घरी आपल्या सुखी राहूनी…..२ पंखात बळ येता बक्कळ उडून जाती पिले सकळ……३ पिले उडाली आई एकली पाखरांसाठी हळहळली…..४ दुनियादारी ऐक रे न्यारी गुज सांगती समर्थ सारी….५ — सौ.माणिक शुरजोशी

ग्रह परिणाम

वळून बघता पूर्व आयुष्यी,  प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती,  आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची,  ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे हे ठरले असूनी,  बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची,  कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके,  गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे,  वा […]

प्रेम

वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी

सैनिक शौर्या

धडाडणाऱ्या तोफेवरुनी     मिठमोहरी उतरते दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते  //धृ//   गेला विसरुनी सगेसोयरे भाऊ बहीण आईबाप बिचारे ह्रदयावरी ठेवून अंगारे दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते  //१// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   डोळ्यामध्यें अंजन घालूनी रक्षण करीतो रात्रंदिनी लक्ष तयाचे इतर जीवनीं तोड नसे ह्या त्याग वृत्तीते  //२// दृष्ट […]

रामाची व्याकूळता

सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची […]

ममतेतील खंत

भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ […]

मिटलेलं पान

तुटलेल्या नात्यांचे जरतारी पदर त्या ना मायेची उब प्रेमाची कदर गाठीगाठीत फक्त बोचरे आठव कशास मिरवायचे? भरजरी पाटव !……… १ तो पाठीवर हात अन डोळ्यात पाणी ते तुडुंबलेलं मन श्वासात गाणी क्षणाक्षणाने दिलं जीवनाचं दान उघडेल का कोणी ते? मिटलेलं पान !………… २ …..मी मानसी

का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

का रमाकृष्ण ना कोणी वदले?….. राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले  हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले ….. ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले  रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले …. तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी […]

1 177 178 179 180 181 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..