नवीन लेखन...

माझं कोकण

स्वसामर्थ्याच्या तपोबलाने, सागरास मागे हटवून परशुरामाने निर्माण केला, हा प्रदेश सुंदर कोकण वळणावळणाची आहे, माझ्या कोकणची वाट किती वर्णावे सौंदर्य तियेचे, सौंदर्याचा थाट जरी बदलली अवघी दुनिया, जरी बदलला काळ माझ्या कोकणच्या मातीसंगे, जुळली माझी नाळ शहरात राहिलो, तरी खुणावते कोकणातली माती कौलारू घर कोकणातले, दिसते या डोळ्यांपुढती देशामध्ये स्वातंत्र्याची, ज्योत जयांनी चेतविली स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीची, ही […]

म्हावरा

खडखडे लाडू नि, मालवणी खाजा; जेवणाक म्हावरा व्हया, फडफडीत ताजा रोज आमच्या चुलीर, म्हावराच शिजो झक मारत जावंदे तो, बर्गर नी पिझ्झो जिताडा, सरंगो, रावस नि तारली; डेंग्यांका मोडून आमी, खाताव ती कुर्ली पापलेट , सुरमय , बांगडो का मिळो; वासावर सांगतलाव, ताजो की शिळो नीट करून झालो, सुंगठ्याचो वाटो; की वाटपाक वल्या व्हयो, वरवंटो-पाटो धणे-मिरी, […]

माझी मानस वारी…

पडल्या पडल्या करते मी मानसवारी. निघाले सर्व पाश तोडुनी मी माझ्या माहेरी डोईवर आहे तुळशी आईचा मायेचा हात. करेन संकटावर विश्वासाने सहज मात… हातात नाही घेता येत मजला टाळ. पण गळ्यात आहे कायमची नाममाळ.. नाही घडली संसाराच्या मोहात पायीवारी या पुढे तरी कायावाचामने घडो जपसेवा खरी…. नाही घडली सेवा. नाही घडली पायीवारी. अपराधी आहे मी म्हणून […]

काजवा

प्रकाश देण्याच सामर्थ्य प्राप्त असलं, तरीही काजवाच तू! तेंव्हा, उगाच पेटत्या मशालीवर झेप घेऊन, तिला विझविण्याचा, केविलवाणा प्रयत्न करू नकोस, लक्षात ठेव! ती धगधगती मशाल आहे, तेव्हा, आहुती तुझीच जाणार आहे. मशाल ती मशालच, पेटेल आणि पेटवेलही, अनेक मशालींना , आणि धगधगत ठेवेल ती ज्वाला, प्रकाशासाठी युगेणयूगे , लेखनातून, विचारातून, तर कधी, व्यक्त होऊन सडेतोडपणे, अंधार […]

संवाद

खुंटला आहे संवाद सारा फक्त नात्यांचा फाफटपसारा सगळे संवाद डिजिटल झाले येता जाता फॉरवर्ड केले नको झाल्यात भेटी गाठी कामात आहे इतकेच ओठी बोलायला नाही कुणालाच वेळ मोबाईल पहा घरातच खेळ माहीत नसतो शेजार पाजार एकटेपणा हाच तर आजार मित्र मैत्रिणी ऑनलाइन फक्त मेसेज मधूनच भावना व्यक्त सोशल मीडियावर घालायचे वाद सगळा वेळ इथेच तर बरबाद […]

मोरया

तीन वर्षांपूर्वी माझ्या षष्ठ्याब्दीपूर्तीच्या निमित्ताने बाप्पावर केलेली कविता. काल रात्री स्वप्नात, एन्ट्री घेतली बाप्पाने. ठोके दिले बाराचे, त्याचक्षणी घड्याळाने. सोंड हलवत, मस्त झुलत – माझ्याजवळ आला, काय पहातोय मी? विश्वासच बसेना झाला. एकसष्ट मोदकांचं तबक – होतं हाती त्याच्या, बाप्पाच्या हातचे मोदक – वाट्याला येणार कुणाच्या? झटक्यात संपूर्ण ताटच त्याने – माझ्यासमोर धरलं, हातात घेऊन हात […]

आशावाद

कॉलेजातल्या पहिल्या दिवशी …… ती दिसता वर्गात पाहताक्षणी गेला भाळून …… पडला प्रेमात आठवड्यातून एकदा तरी …… लिहायचा पत्र तरी उत्तर नाही नकार नाही …… अस्पष्ट हे चित्र इतक्या चिठ्ठ्या लिहून काही …… मिळेना दाद होकाराची वाट पाहिली …… दुर्दम्य आशावाद अन् वर्षामागुनी सरली वर्षे …… संपले कॉलेज शेवटच्या दिशी तिजला पाहुन …… धस्स काळीज अखेर […]

समर्पण

फुलांसारखे फुलत जगावे ब्रह्मांडाला गंधाळीत रहावे सृजनाचा अविष्कार आगळा विश्वात्म्याला सदैव स्मरावे… विलोभनिय ही अदा सृष्टीची त्या सौंदर्यात भुलुनी जावे साक्षात्कार सारा चैतन्याचा सुखामृताला प्राशित रहावे… निसर्गाचेच तत्व निरागस ते हॄदयांतरी जपत रहावे जीवा जगवितो तो कृपाळू निरंतर त्याला भजत रहावे… फुलांसारखे फुलता फुलता निर्माल्यातही सुख मानावे समर्पणात सौख्य आल्हादी याचे भान नित्यची असावे… ******** — […]

भावनांचा गहिवर

विसावता क्षितिजी तेजोगोल अस्ताचलावर केशररंगी अंबर मनभावनांची उलघाल अंतरी सावळबाधी सांजाळ वेदिवर…. मंदमंद धुसर ती कातरवेळा जीवनसंध्येचा हा भास सुंदर घोंगावते आठवांचे मोहोळ उभा सामोरी तो मुरलीधर… अंतर्यामी आज घुमते पावरी लोचनी तरळतो श्यामलसुंदर आज आठविती मित्र सगेसोयरे उचंबळतो भावनांचा गहिवर… ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३२८ ११/१२/२०२२

निर्मळ जीवन

जन्मोजन्मीचा हा जन्म मानवी हसत सरावा उधळीत सुखाला मनी नसावा भाव दुजेपणाचा क्षणोक्षणी जपावे मनामनाला साधेसुधे निर्मळ जीवन असावे शांतवीणारे तनमनांतराला भौतिक सुखदा ही क्षणभराची असो शाश्वताचा ध्यास जीवाला आत्ममुख आपण होत रहावे उगा दोष देवू नये कुणाला जीवाजीवा प्रेम देत जगावे जगी जपत रहावे मानवतेला ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३२७ १०/१२/२०२२

1 16 17 18 19 20 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..