नवीन लेखन...

वाटतो आहे नकोसा पिंजरा !

वाटतो आहे नकोसा पिंजरा! लागली तृष्णा नभाची पाखरा!! संपली नाही प्रतीक्षा जन्मभर वाट बघणाराच झालो उंबरा! स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले? काळजाचा शोध कानाकोपरा! तू नको बोलूस काही, शांत बस सांगतो आहे कहाणी चेहरा! तूच माळायास नाही राहिली…. पार कोमेजून गेला मोगरा! ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते…. कोण खोटा, कोण अन् आहे खरा? प्रेत म्हणते, का रडू […]

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी नशीबाला परी दोष न देता,  […]

लोक

बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी

दिवाळीचे दिस

तेच दिवाळीचे दिस तोच आनंद उल्हास परि बाबा-आई माझे मज दिसले उदास….. कसे जुळावे गणित नव्या खाऊ कपड्यांचे अन् खुलेल मानस सान कोवळ्या जीवाचे इथे वाढती असोशि तिथे मन कासावीस तेच दिवाळीचे दिस…. कधी आईचा दागिना कधी एखादा ऐवज जाई सावकारा हाती खुल्या मनाने सहज अन् सजली दिवाळी मला हवी तशी खास तेच दिवाळीचे दिस… आज […]

सौंदर्य दृष्टी

कां मजला ही सुंदर वाटते ?  दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ? कोण हे ठरवी निश्चीत,  मजला काही न कळते असेल जाण सौंदर्याची तर,  दिसेल सर्वच सुंदर नयनी तिच एक कशी असेल सुंदर,  जग सारेच असतां सुंदर सौंदर्याची दृष्टी नाहीं,  म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही पूर्वग्रह दुषित असते,  तेच सौंदर्याचे परिणाम ठरते मला जे भासते सुंदर,  दुजास […]

तो एकमेव ढग काळा….

तो एकमेव ढग काळा, जग सारे तहानलेले ही एक भाकरी अवघी, जग सारे भुकेजलेले मी ऐल तिरावर आहे, अन् पैलतिरावरती तू अन् मधे एवढा सागर वर वादळ उधाणलेले अंगात त्राण या नाही, कंठात प्राण आलेले ऐकाया कैसे जावे कोणाला पुकारलेले हृदयाचे माझ्या पुस्तक मी सहसा उघडत नाही प्रत्येक पान जखमांचे रक्ताने चितारलेले दिनरात चालतो आहे पण […]

नको राजसा अंत पाहू

नको राजसा अंत पाहू , डोळे वाटेकडे लागले, किती रात्रंदिन साहू , विरहव्यथेने तळमळले,–!!! अजून नाही आलास तू , संजीवनही आता संपले, कोरडा होईल ना रे ऋतू , जरी हिरवेपण ते दाटले,–!!! अंगप्रत्यंगी चिंब भिजू , स्वप्न डोळियांनी पाहिले, तव स्पर्शाची जादू ,– तनमन किती लालसावले,–!!! मिलन आपुले किती योजू , दिन – रात कमी पडले, […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]

कोण आहेस तूं कृष्णा ?

कोण आहेस तूं कृष्णा ? सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।। जीवन तूझे ‘बहूरंगी’ सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून ‘खादाड’ वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? फळे चारली बागेमधली गोपींची […]

तुझा कोपही वाटतो मज प्रणय !

तुझा कोपही वाटतो मज प्रणय! तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!! हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी किती गोड माझा-तुझा हा विलय! तुझी नस नि नस जाणतो मी सखे तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय! असे काय माझ्यातले डाचते? तुझे माझिया भोवतीचे वलय! जगाला कसा कमकुवत वाटलो? असे कारणीभूत माझा विनय! अता लागली जिंदगानी कलू…. कधी व्हायचा […]

1 179 180 181 182 183 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..