नवीन लेखन...

लाडकी चांदणी

एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती चमचम चमके, मिश्कील हासे,      लक्ष्य खेचून घेई   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला दिवसभराचा विरह तिचा,          नाही सहन झाला   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी होकार दिला चटकन तिने,        किंचित हास्य करुनी   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली   नजर पडता नातीवरी,         चकित  झालो एकाक्षणी अंतरयामी  जणीव झाली,        हीच ती माझी चांदणी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

 नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे……।। धृ ।। श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे….१,  कोडे हे उकलून घ्यावे एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे……२, […]

मन बावरा पक्षी उडतो…

मन बावरा पक्षी उडतो कल्पनांच्या आभाळातून, अंतरातून हाक देतो, विराण त्या जीवनातून, दिगंतराच्या जवळ जातो विराट त्या उड्डाणातून, दिशादिशांना आवाज देतो, अंतर्नादाच्या शांत शीळेतून, सभोवार ढगात वावरतो विशाल पंख फैलावून, एकटाच मस्तीत जगतो, गजबजत्या दुनियेत राहून, धरेवरुनी नभात जातो, आत्मिक सारे बळ घेऊन, प्रचंड इच्छाशक्ती राखतो उदंड आभाळा मात देऊन,- एकटाच त्याच्याशी लढतो, झुंज खेळून परतून, […]

सोड मागणी

मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड […]

डोळे अर्धोन्मीलित

डोळे अर्धोन्मीलित, स्वप्नात रंगलेले, पापण्यांचे निमुळते काठ, आसवांत भिजलेले ,–!!! कळी अर्धोन्मीलित, पाकळी कशी उमले, पानांचे भोवती राज्य, सुगंधाने भारलेले,–!!! तन अर्धोन्मीलित, तारुण्याने मुसमुसलेले, चहूकडून फुलत, यौवनाने भरलेले,–!!! काव्य अर्धोन्मीलित, पण अर्थगर्भतेने, मनात राज्य करत, नवरसांनी भरलेले,–!!! सृष्टी अर्धोन्मीलित, चरांचरांत पसरलेले, जीवनदायी संजीवन, जिथे तिथे मुरलेले,–!!! प्रेम अर्धोन्मीलित, हृदय भरलेले, मनातील राजकुमार, अंतरी वसलेले,–!!! पहाट अर्धोन्मीलित, […]

सुगंध पसरे चारही दिशा

सुगंध पसरे चारही दिशा, मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा, वारा वाही, सुवास खासा,–!!! फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे, किमया सारी निसर्गाची, तोरणे सतत लावत असे,–!!! जंगी असे स्वागत एवढे, खास चालले कुणासाठी, कोण कोणासाठी झुरे,- -कोण अवतरे पृथ्वीवरती,—? सडा पडतो खाली फुलांचा, का घातल्या पायघड्या, रंगांची अशी मांदियाळी, अत्तराचे कोण शिंपी सडे,–!!! कोमल, मऊ, […]

हवापाणी

माणसाचे तेज डोके कसे पिकू लागले? निसर्गात मिळे फुकट तेच विकू लागले! हवा होती मुक्तवावर बंदिस्त होऊ लागली रस्त्यावर , दुकानात पैसा कमवू लागली! पाणी होते प्रवाही बाटलीबंद झाले जारबंद संस्कृतीला पैसे मोजू लागले! माती तर अमापच बघा जिथे तिथे मिळे विटा पाडून भट्टीवर बंगले बांधू लागले! हवा, पाणी, मातीची अशी चालू लूट आहे कुरतडे उंदीर […]

दुष्काळ

आला म्हणती तो काळ असा पडतो दुष्काळ ||धृ || नसते पिण्यास पाणी नसते खाण्यास धान्य नसते रानात पळपळ नसते वनात सळसळ ||१|| मरती भूकेली गुरंढोरं पडती आजारी पोरंसोरं होई जीवांची तळमळ रडते कडेवर ते बाळ ||२|| मोकळी झालेली गव्हाण दु:ख धरतीचं आंदण होई ओसाड तो माळ राती भेटेना सकाळ ||३|| कुठे घडतेय माळीण कुठे गुडूप किल्लारी […]

तयांना मृत्यूची वाटे भीति

अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।। गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति….१, आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति….२, समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी सहानुभूती,   तयांना मृत्यूची […]

ब्रेक्झिट (१) (लघुकाव्यें)

1 पाहिजे तेवढं Brain-Storm पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? 2 Brexitच्‍या प्रत्‍येक विकल्‍पाला MP म्‍हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. 3 MP बसलेत डोकं खाजवत UK च्‍या नांवाला लागतोय् बट्टा. अरे, Brexit आहे की थट्टा ! 4 ब्रेक्झिटचा प्रश्न असा आहे गूढ की, मतदानावर मतदान चाललंय् पण निघतच नाहीं […]

1 180 181 182 183 184 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..