आस…
ओळीने चालल्या बगळ्यांच्या रांगा हा निरोप अमुचा त्या ढगांना सांगा तहान लागली धरतीच्या लेका थेंब पावसाचे जमिनीत टाका पुरे झाली आता दुष्काळाची सजा पाषाणहृदयी तू होऊ नको राजा झाडांना दे पाणी जनावरांना चारा धान्याची बरकत जीवांना निवारा ओळीने चालल्या… — © विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५