नवीन लेखन...

पाहताना तुला पावसाळी

पाहताना तुला पावसाळी, थेंबा–थेंबानी जादू पसरे, तनी मनी प्रीत ओघळती, रोमारोमात प्रेमगंध उधळे,–!!! बरसताना मेघ गडगडाटी, विद्युल्लता कशी उचंबळे, जिवलगाची ओढ केव्हाची, मिटल्या ओठी यौवन उन्मळे,–! सर येता मोठी पावसाची, अणू रेणू ओलाचिंब करे, भिजण्यातही रूक्षपणा भारी, जोवर नाही आपण सामोरे,–!!! सर्द हवा कशी ओली, मनातलेही काहूर तसे,– अवचित तुझी मूर्त पाहिली, हृदयी, कारंजे उडत असे,–!!! […]

द्रौपदी वस्त्रहरण

ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला […]

आठवावे मृत्यूसी

निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती II १II उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत II २II ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने II ३II वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे II ४ II मातीची भांडी […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे    कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे    जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां     दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां    हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता    हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह    दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन     यांची मिळून जोडी जीवनातील यश    तुमच्या पदरीं पाडी ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

कोण ती स्फूर्ती देवता ?

मजला नव्हते ज्ञान कशाचे,  पद्यामधल्या काव्य रसाचे  । कोठून येते सारी शक्ती,  काव्य रचना करूनी जाती  ।। अवचितपणे विचार येतो,  भावनेशी सांगड घालीतो  । शब्दांचे बंधन पडूनी,  पद्यरूप जातो देऊनी  ।। सतत वाटते शंका मनी,  हे न माझे, परि येई कोठूनी  । असेल कुणी महान विभूती,  माझे कडूनी करवून घेती  ।। तळमळ आता एक लागली,  जाणून […]

निरोप

तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम देवा तिजला दूरवर बघत राहीन ती लेकीला लेक चालली निरोप घेवूनी सासरी भरल्या नयनी माय उभी शांत दारी जड पावले पडता दिसती लेकीची ओढ लागली त्याच पावलांना मायेची उंचावूनी हात हालवीत चाले  लेक जलपडद्यामुळे दिसे तीच अंधूक वाटेवरूनी जाता जाता दृष्टीआड झाली अश्रूपूसून पदराने माय घरात आली दूर गेले पाखरू ते आकाशी उडून […]

विचार आतला…

विचार आतला, काळोख दाटला, उजळत्या घरां, आत्मा पाहिला,–!!! चिंता दु:खे, बोचरी सुखे, विलक्षण खंता, हृदयाला भिडतां,–!!! मी तूपणा गळतां, अंतरात्मा छळता, प्राणातील परमात्मा, मोक्ष मागतां,–!!! जीव सुटेना, कर्मात,भोगात, अडकून राहिला, दार उघडतां,–!!! मुक्काम बदलतां, नसते हातां, व्यथा हृदयां, जिवा छळतां,–!!! स्वर्ग-नरक, कल्पना नुसत्या, माणसांच्या वस्त्या, नकोशा-नकोशा,–!!! © हिमगौरी कर्वे

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही,  कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी,  हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां,  बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील,  भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा,  नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील  भीजव त्यांचे सारे अंग…३   (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)   — डॉ. भगवान […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  चित्त चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंताचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असूनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

पण आणि परंतु….

पण आणि परंतु, मध्ये सारखे येती, निर्माण करती किंतू , जीवनही ते बिघडवती –!!! गोष्ट कुठली सरळ , आयुष्यात होत नाही, प्रत्येकाचे त्यांच्यावाचून , पदोपदी अडत राही,–!!! सुख– दु:खांची असो भेळ, असो अडसर भोवती, मार्ग नसण्यात निव्वळ चोख भूमिका निभावती,–!!! ते नसते तर आयुष्याची, मग न्यारी नसती कुठली गंमत, त्यांच्याशिवाय भाषा अडतसे, सतत सारखी केव्हाही अविरत,–! […]

1 182 183 184 185 186 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..