नवीन लेखन...

श्रीकृष्णासी कृष्णकमळ अर्पण

वाहूनी कृष्णकमल तव शिरी, अर्पितो भाव माझे श्रीहरी….।।धृ।। तू आहेस ईश्वर, करी सारे साकार नशिब माझे थोर मिळे तुझा आधार सेवेसाठी कृपा होता मजवरी, शब्द गुंफूनी कविता करी….१, अर्पितो भाव माझे श्री हरी…. विविधतेने नटलेले कृष्णाचे जीवन गेले लय लागूनी जगले, कसे जगावे शिकवले जीवन सारे असूनी रूप ईश्वरी,  दाखवी स्वानूभवे तो हरी….२ अर्पितो भाव माझे […]

 भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।। आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।। वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।। […]

मोहीनी शरद् पोर्णिमेची

मोहीनी शरद् पोर्णिमेची की पापण्यांच्या अर्धोन्मिलीत चंद्राची अतृप्ततेचा भास हा की चांदण छायांची बाधा ही विखार यौवनाचा असा शोषतो अभिशाप जाणिवांचा बेभानतेचा अंगार हा मंत्रचळातला विखार जसा.. खरंच रेंगाळतोस का रे मनांत..? अस्पष्टसा.. अंधुकसा… कुठेतरी धुक्यातल्या इंद्रधनुसारखा मखमली मलमली तारुण्याचा पिसारा उलगडत… स्वप्न झुल्यांची तोरणं पापण्यावर झुलवत सोसांचा इतका आवाका अवखळ होणं ,बेभान होणं कधी थांबवशील..? […]

बाळाची भिती

खेळत होता बाळ अंगणीं    इकडूनी तिकडे मेघनृत्य ते बघत असतां    दृष्टी लागे नभाकडे उलटी सुलटी कशी पाऊले    घनांची पडत होत लय लागून हास्य चमकले     त्याच्या मुखावरती तोच अचानक गडगडाट झाला    एक नभांत दचकून गेले बाळ तत्क्षणी     होऊन भयभीत धावत जावून घरामध्यें    आईला बिलगले वाचविण्या त्या भीतीपासून     पदराखालीं दडले जरी थांबला गडगडाट    भीती कायम होती आवाजाचे नाद […]

करून बघ !

फुलेल नातं तुझं माझं करून बघ एक उपाय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं काय? खोटं काय?——!! तोलू नकोस ताजव्यात आल्या गेल्या क्षणांना काठावरच बसून रहा सोडून फक्त पाण्यात पाय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं काय? खोटं काय?——!!१ माझ्या मनात तूच आहेस चाचपडणं सोडून दे खदखदतंय मनात जे अलगद त्यावर धरेल साय नको विचारुस पुन्हा पुन्हा खरं […]

खेळ केवढा चाललेला

खेळ केवढा चाललेला, या दुनियेच्या पटावरती, पर्याय नसे सोंगट्यांना, कळसूत्री बाहुल्या हलती,–!!! जेजे घडे, मागे त्या, कर्ता करविता असतो कोणी, दिसत नाही आपल्या डोळ्यांना, जाणिवे नेणिवेच्या पल्याडही,–! कोण घडवी सगळ्या घटना, मदत करी अडल्या प्रसंगी, असंख्य रूपे तुझी देवा, दिसती आम्हा समयी समयी,–!!! करुणा शांती क्षमा, प्रेम, दया, भावनांचे किती प्रकार असती, सिद्ध करत आपुला देवपणा, […]

नभांगणी मेघ जमू लागले

नभांगणी मेघ जमू लागले, बघतां बघतां, बरसू लागले, तुझ्यासाठी रे नयन, असे सतत तरसू लागले,–!!! धरणी संजीवनात नहाते, अंगांग तिचे जसे भिजे, प्रेमवर्षावी तुझ्या बघ, पंचप्राण तसे आसुसले,–!!! वाऱ्यावादळांनी होई जसे, रोमांचित तन धरणीचे, तसेच तुझे येणे भास कणकण उठती शहाऱ्यांचे-!!! धरणीचे स्वरूपच हिरवे, तरो -ताजेपण तिचे, काया होत टवटवीत, तसेच हिरवेपण भरले,–!!! माझे स्त्रीत्व,; तुझे […]

असे निसर्गाचे चक्र

रोपट्याचे होते झाड, झाडाचा होतो वृक्ष, वृक्षातून मिळते बी, असे निसर्गाचे चक्र, –!!! पाण्याची होते वाफ, वाफेचे होतात ढग, ढगांचे पुन्हा पाणी, असे निसर्गाचे चक्र,–!!! सृष्टी मातीतून जन्मे, चराचरातील घटक, घटकांचे होते विसर्जन, मातीत जातात मिळून, असे निसर्गाचे चक्र,–!!! जन्मतात किती झरे, जाऊन मिळती नदीला, नदी एकरूप सागराशी, सागरांतुनी पुनश्च वाफ, असे निसर्गाचे चक्र,-!!! कचऱ्याचे होते […]

काय हाती सरतेशेवटी

काय हाती सरतेशेवटी, जीवन पुढे पुढे जाते, करत रहावी पुढची बेगमी, पैलाची वाट बोलावते,–!!! या तीरावरून त्या तीरी, पोहोचणे असते का सोपे, ऐलाची हाक सतत कानी, मध्ये उगी खेचती भोवरे,–!!! ऐहिकाची ओढ राही, पाणी ढकलत राहते, लौकिकाचा छळ नशिबी, तनमन गटांगळ्या खाते,–!!! स्वर्गच जणू पैलतीरी, नरकातून वाहत जाणे, सुख- दु:खांनी श्वास कोंडती, हेलकाव्यांचेच ते जिणें,–!!! मरण […]

कळ्या नाजुकशा

कळ्या नाजुकशा, फुलल्या तुझ्यासाठी,–!!! गगनी चांदण्या, आल्या तुझ्यासाठी,–!!! घमघमणाऱ्या केवड्या, सुगंध तुझ्यासाठी,–!!! आरक्त प्राजक्ता, पखरले तुझ्यासाठी,–!!! दिमाखदार चाफ्या, लुटले तुझ्यासाठी,–!!! मदमस्त मोगऱ्या, खुडले तुझ्यासाठी,–!!! बकुळां,अर्धमिटल्या, वेचले तुझ्यासाठी,–!!! सायलीच्या सुगंधा, मोहित तुझ्यासाठी,–!!! अबोलीच्या वेण्या, माळल्या तुझ्यासाठी,–!!! मंद- मंद रातराण्या, उमलल्या तुझ्यासाठी,–!!! यामिनीला ढळत्या, मातले तुझ्यासाठी,–!!! आलिंगनात तुझ्या, सहज विरघळण्यासाठी,–!!! © हिमगौरी कर्वे

1 184 185 186 187 188 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..