हवीहवीशी मनास शांती
हळूच पाऊली येते संध्या जाते बिलगत यामिनिला विलोभनिय ते प्रहर सारे चाहुल निरवतेची सांजेला…. हवीहवीशी मनास शांती मिठित घेते काळोखाला अनाहत अबोली एकरूपता कुरवाळीते जीवाजीवाला… भावगंधल्या त्या प्रीतभावनां सजवुनी जाती मनामनाला आत्मानंदी साक्षात्कार सुंदर अंतरी उधाण येते आनंदाला…. ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३२६ ९/१२/२०२२