नवीन लेखन...

अनुवादात्मक

सारखा संघर्ष करत करत, अंतर्मन तुटून जाई, सुखाचे भरभरून समुद्र मग भले मिळोत कितीही,— किती त्याला अर्थ नाही,–? अशा जीवनात अर्थच नाही,–? पाण्यावाचून कोरडे, पडत, पीक सारखे गळत राही, मग पडत राहिला पाऊस, किती त्याला अर्थ नाही,–? अशा जगण्याला अर्थ नाही,–? किती मोठा असे परिवार, करत असेल जर दुःखी, हे असले कसले संबंध,–? करती मने दूषित […]

दाक्षायणी

गौरी, अभाव्या अहंकारा, अग्निज्वाला.. अनेकशस्त्रहस्ता ईतकी सामर्थ्यशाली असूनही दक्षाच्या अपमानामुळे यज्ञकुंडात समिधे सारखी जळत..राहीली.. उमा-पार्वती ..तीचा उद्वेग कवितेतून मांडायचा प्रयत्न मी केलाय .. मागच्या वर्षी केलेली कविता थोडी वाढवली आहे .. चंद्रचूडासाठी पुन्हा गौरी, अपर्णा  […]

नभांगणी आज मेघ

नभांगणी आज मेघ, कुठून कुठे चालले, शेकडो योजने प्रवास त्यांचा, कोणी त्याला मापिले,–!! निळे काळे भरले ढग, एकत्र जमून पुढे चालले स्वैर विहरती त्यात विहग, लांबवरी ते उडत चालले,–!!! या मेघांची बनते माला, इकडून तिकडून सर्व बाजूला, जसा लवाजम्यात घोळका, निघाला तसा काफिला,–!!! मध्येच एखादा मेघ डोकावे, संजीवनाने ओथंबलेला, अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,–!!! कोणाची […]

निघून जरी जाशी

निघून जरी जाशी,— मम आयुष्यातुनी तू , तरी सारखा मागे उरशी, लपलेल्या अंत:करणी तू ,— तीर जसा वेगे शिरतो, घायाळ करत अचानक, तसा तू बाण बनतो, छेद आरपार देत,–!!! तो जसा बंबाळ करी, पर्वा ना त्याला कुठली, कोण त्याला थोपवी, न कुणी त्यावर मात करी, तसेच तुझे घुसणे,– मम हृदयी, आंत आंत, कितीदा नव्याने पुन्हा जगावे […]

 कठीण खेळ

चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।।   डॉ. […]

काळ्याशार तमांमध्ये

काळ्याशार तमांमध्ये, पाणीही बनते कुट्ट काळे, रंग खेळती मजेत तिथे, पंचमीची क्रीडा चाले,– पिवळसर, सोनेरी, हिरवटसे, विचरती पाण्यात रांगेने, बिंदू सारे प्रतिबिंबित कसे, पाहती डोकावून,उत्कंठेने,–!!! वाकून खाली सगळे जरासे,— प्रतिमा आपुलीच न्याहळत, घेती धडे एकरुपतेचे,–, पुढे पुढे सरकत,सरकत, एक दुसऱ्यात असा मिसळे, एकत्रीकरण जणू कंगोऱ्यांचे,–!!! विविधरंगी त्यांची दुनिया, मूळ रंग मात्र एकच असे, विविधतेतून एकता ना, […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध    धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध      ऐष आरामांत ते नाहीं   एका गोष्टीची उकलन   कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून   देह सुखासाठीं   परि लागता ध्यान     प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन     हीच भावना उरीं   सर्वस्व अर्पा प्रभुला    हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला    आनंद जीवनाचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

भेटीची आस तुझ्या

भेटीची आस तुझ्या, नित्य मज छळते , तुझ्यासाठी सखया, रात्रंदिन मी झुरते,–!!! चित्र पाहूनी तुझे, जिवाची ओढ लागते, जन्मोजन्मीचे नाते असता, कशी हुरहुर वाढते,–!!! थेट अंतरातुनी मला, जसे तुझे बोलावणे, घालमेल होता जीवा, आतल्या आत लपवते,–!!! जेव्हा कल्पते एकांता, माझी न मी राहते, तुझ्यासंगे भान हरपता, वास्तवालाच मी विसरते,–!!! मनाचा हा ओढा, कसाबसा रे दडवते, आतल्या […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव तो,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४   डॉ. भगवान […]

ऋतू

किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये, वाट पाहताना जीव थकला, मन चिंतातूर आतमध्ये,— सारखे हे काळीज उले, चंद्र उगवे हा डोईवरी,— का सवतीने वाट अडवली, मोहात पाडत तुला सत्वरी,–!!! कितीक दिन होऊन गेले, ना निरोप कसला संदेश, तू गेल्यावर भोवताली, वाटे हा परकाच प्रदेश ,–!!! भोवती आहेत नाती सारी, आवडते ही मज सासुरवाडी, राम नाही […]

1 190 191 192 193 194 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..