नवीन लेखन...

भक्ष्य

नदिकाठच्या कपारीमध्ये,   बेडूक बसला दबा धरूनी उडणाऱ्या त्या माशी वरते,  लक्ष सारे केंद्रीत करूनी…१, नजीक येवूनी त्या माशीचे,  भक्ष त्याने करूनी टाकले परि दुर्दैव त्याचे बघा कसे,  सर्पानेही त्यास पकडले…२, बेडूक गिळूनी सर्प चालला,  हलके हलके वनामधूनी झेप मारूनी आकाशी नेले,   घारीने त्याला चोचित धरूनी…३, ‘भक्ष्य बनने’ दुजा करिता,   मृत्यूची ही चालते श्रृखंला जनक असता तोच […]

कधी वाटते

कधी वाटते, कोसळता पाऊस व्हावे, रपरप पडत धरणीला, सर्वकाळ बहरत ठेवावे,— कधी वाटते उसळणारा दर्या व्हावे, विशाल रूप बघणार्‍यांना, चकित करून सोडावे,— कधी वाटते लख्खकन आभाळी चमकावे, प्रचंड मोठी वीज होऊनी, पृथ्वीला भारावून टाकावे,— कधी वाटते घनगर्द अरण्य व्हावे, भयभीत आकार पाहुनी, इतरांनी गर्भगळीत व्हावे,— कधी वाटते, झुळझुळणारा झरा व्हावे, आपल्याच धुंदीत मस्तमौला, सगळीकडे थेंब लुटावे,— […]

दया प्रेम भाव

दया प्रेम हे भाव मनी,  जागृत कर तू भगवंता तुला जाणण्या कामी येईल,  हृदयामधली आद्रता शुश्क मन हे कुणा न जाणे,  धगधगणारे राही सदा शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा पाझर फुटण्या प्रेमाचा तो,  भाव लागती एक वटूनी उचंबळणारे ह्रदय तेथे,   चटकन येईल मग दाटूनी दया प्रेम या भावांमध्ये,  दडला आहे ईश्वर तो मनांत येता […]

देवघरात तेवते शांत

देवघरात तेवते शांत, प्रशांत अगदी समई, ज्योत स्थिर होत, अचल जशी राही,— केवढा त्याग तिचा, दुसऱ्यासाठी समर्पण, दुनियेला या प्रकाशत, केले जीवन अर्पण,— कर्तव्यबुद्धी किती असेल, कठोर घेतले व्रत, क्षणाक्षणाला जळत जळत, आयुष्य पुरे देऊन टाकत,— तिच्यामुळे कळे खरा, आयुष्याचा अर्थ निराळा, अंगोपांगी झिजत झिजत, मंद अगदी तेवते वात,–!!! ज्योत दिसे कळीगत, सारखा त्यातून प्रकाश स्फुरत […]

सांसारिक प्रवास

भातुकलीच्या डावांत मांडला, संसार राजा राणीचा,— इवल्याशा घरात चालला, सांसारिक प्रवास त्यांचा,–!!! छोटी छोटी भांडी कुंडी, छोटे छोटे सामान, इवली इवली सामुग्री, करत सुख-रसपान, –!!! हळूहळू संसार वाढला, आले सोनुले बाळ, कळले नाही कधीच, किती निघून गेला काळ,—!!! राजाराणी मग्न आपुल्या, छोट्या चिमुकल्या विश्वात, बाळ बालीश,वाढे निरंतर, त्याला तारुण्य आले झोंकात,-!! नादातच तो आपल्या राही, वाहन […]

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी,  अस्थिर आम्ही जगू शकतो अस्थिर आहे जग म्हणून,  स्थिर आम्ही जगू शकतो….१ पोटासाठी वणवण फिरे,  शोधीत कण कण अन्नाचे थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे….२ धरणी फिरते रवि भोवतीं,  ऋतूचक्र हे बदलीत जाते जगण्यामधला प्राण बनूनी,  चैतन्य सारे फुलवून आणते….३ पूरक बनती गुणधर्म परि,  स्थिर असतो वा अस्थिर ते विश्वचक्र फिरवित […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी […]

ताई माझी मोत्यांची माळ ग

ताई माझी मोत्यांची माळ ग, घाल तुझ्या गोऱ्यापान गळां ग, टपोरे पाणीदार छोटे मोती ग शोभतील तुझ्या कसे कंठी ग, ताई तू अशी सौंदर्यवती ग, देखणी म्हणू, लावण्यवती ग, सुकुमार तू जशी, फुलवंती ग, जशी टवटवीत जास्वंदी ग, आखीव रेखीव – ठाशीव ग, जसे एखादे शिल्प-कोरीव ग, मज वाटे तुझा अभिमान ग, बघती तुला आ वासून […]

 लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला  । रात पुनवेची मधूर भासला  ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला  । शितल वारा अंगी झोंबू लागला  ।। उलटून गेली रात्र मध्यावरती  । लुक लुकणारे तारे आतां दिसती  ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती  । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती  ।। त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे  । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे  ।। […]

वैचारिक

माझ्या भोवताली, माणसांचे रान, चहूबाजूंना असूनही, वाटा सुनसान,–!!! टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, नातीगोती किती, प्रश्न एकच पडे, विचारती किती,– टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, मित्रपरिवार किती, असंख्य हात निव्वळ, फक्त वर ते उठती, टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, पिके खूप मतांची, उपयोगाला येती, त्यातील का कधी,–!! टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, […]

1 196 197 198 199 200 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..