नवीन लेखन...

पाऊस आणि मोबाईल

द्यायला हवा होता एक मोबाईल पावसालाही, कळलं असतं मग त्याला आज कुठे बरसू आणि कुठे नाही | Whatsapp वरून त्याला रोज कळवले असते Updates आणि रोज दिले असते त्याला नवीन Targets | फोटोज व्हिडिओज बघून त्यालाही कळली असती आपली दैना बरसताना त्याने नक्कीच विचार केला असता पुन्हा पुन्हा | परफेक्ट त्याचा Performance असेल जिथे हिरवीगार धरती आणि आनंदी शेतकरी […]

बाळाची निद्रा

चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची,  कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही,  भावनाचे सामर्थ्य दिसले….१ कुणासी म्हणावे ज्ञानी,  रीत असते निराळी शिक्षणाचा कस लावती,  सर्व सामान्य मंडळी…२ कोठे शिकला ज्ञानोबा,  तुकोबाचे ज्ञान बघा दार न बघता शाळेचे,  अपूर्व ज्ञान दिले जगा….३ जिव्हें मधूनी शारदा,  जेव्हा वाहते प्रवाही शब्दांची गुंफण होवूनी,  कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार,  माझी अंबिका भवानी […]

सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात,   चालू असते सतत ज्ञानाची गंगोत्री वाहते,   पिणाऱ्यालाच ती मिळते प्रत्येक क्षण दयेचा,   टिपणारा ठरे नशिबाचा जलात राहूनी कोरडे,   म्हणावे त्यास काय वेडे फळे पडतां रोज पाही,   त्याची कुणा उमज न येई परि न्यूटन एक निघाला,   बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला चहा किटलीचे झाकण हाले,   स्टिफनसनने इंजीन शोधले जीवनातील साधे प्रसंग,  शास्त्रज्ञांची बनले अंग प्रभू असतो […]

जाळी

धागा धागा विणून,  केली तयार जाळी गोल आणि बहुकोनी घरे,  पडली निर निराळी….१, स्थिर सुबक घरे,  जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव,  न दिसे कुणा कोठे….२, तुटेल फूटेल तरी,  सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही….३, जगे तो अभिमानानें,  मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश,  झेलीत होती त्याची पाठ….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

उदबत्ती एक आत्मसमर्पण

उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं      प्रश्न मजला पडे मंद मंद जळते     शांत तुझे जीवन धुंद मना करिते    दूर कोपरीं राहून जळून जातेस तूं    राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण    सर्वत्र सुगंध पसरी तुझेपण वाटते क्षुल्लक    दाम अति कमी आनंदी होती अनेक     जेव्हां येई तूं कामीं लाडकी तूं भक्तांना    तुजवीण पूजा नाहीं प्रफूल्ल करुन चेतना    प्रभू […]

पुंडलिकाचे दैवत

आईबापाच्या सेवेमध्यें, पुंडलीक रंगला, उभा विठ्ठल दारावरती,  हेच तो विसरला  ।।धृ।। आईबाप हे दैवत ज्याचे, रुप पाही त्यांच्यात प्रभूचे  । सेवा करीत आनंद लूटतां,  तल्लीन जो जहला उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  ।।१।। निद्रेमध्यें असतां दोघे, मांडी देऊनी आपण जागे  । कशी मोडू मी झोप तयांची,  प्रश्न विचारी भगवंताला, उभा विठ्ठल दारावरती हेच तो विसरला  […]

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी || चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले || नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी || आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता […]

मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत,   भटकत होतो नदी किनारी मैनेची ती ओरड ऐकूनी,   नजर लागली फांदीवरती…१ एक धामण हलके हलके ,  घरट्याच्या त्या नजीक गेली पिल्लावरती नजर तिची,  जीभल्या चाटीत सरसावली…२, मैनेच्या त्या मातृहृदयाला,  पर्वा नव्हती स्वदेहाची जगावयाचे जर पिल्लासाठी,  भीती न उरी ती मृत्यूची…३ युक्त्या आणि चपळाईने,  तुटून पडली त्या मृत्यूवरी रक्त बंबाळ ते केले शरीर,  चोंच […]

निवृत्तीची वृति

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी दूर ही जावूनी खंत न वाटे,  घडत असते कसे मनी…१, बहुत वेळ तो घालविला,  फुल बाग ती करण्यामध्ये विविध फूलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे….२, कौतुकाने बांधी घरकूल,  तेच समजूनी ध्येय सारे कष्ट करूनी मिळवी धन,  खर्चिले ते ह्याच उभारे…३ संसार करूनी वंश वाढवी, संगोपन ते करूनी […]

1 197 198 199 200 201 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..