नवीन लेखन...

खरे श्रीमंत

आनंद मोजता येत नाही जवळ असलेल्या नोटांमध्ये श्रीमंती मोजता येत नाही आलिशान फ्लॅटच्या भव्यतेमध्ये किती ही पैसा असला तरी तो कमीच भासतो दुसऱ्याचा महाल बघून आपला फ्लॅट छोटा वाटतो दुःख भोगल्यावर कळतं की सुख काय असतं दुसऱ्यांच्या वेदना पाहिल्या की कळतं आपण खरं तर किती श्रीमंत असतो — दिप्ती गोगटे

निर्विकार

गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे अगदी निर्विकार जणु ओळखच नाही न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही मग्न असती सारेच आपुल्या विचारात इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही मी भला, माझे भले नको कुणी दूसरे आता नाते सहृदयी कुठेच उरले […]

कर्मफल

  अस्वस्थ जीवा छळते घुसमट मन मुक्त मोकळे करत रहावे प्रहर व्याकुळलेला एकांताचा अंतर्मुख होवुनी सत्य जाणावे गतजन्माचे ऋणानुबंध जीवनी जीवाजीवाला जपत रहावे भावशब्दांचे लाघव प्रीतस्पर्शी मुक्तहस्त्ये सदा उधळीत रहावे अगम्य सारिपाट तो जीवनाचा निःसंकोची खेळतची रहावे आपुल्या हाती काहीच नसते भाग्य भाळीचे झेलित रहावे सुखदुःख आनंद खंत वेदना कर्मफल म्हणुनी भोगत रहावे ********* –वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) […]

स्मरण

आव्हानांना पेलत पेलत आता फक्त जगत रहावे कयास सारे कलियुगाचे ओळखुनी सतर्क जगावे व्याख्या जगण्याची बदलली तीच उमजुनी जगत रहावे भुरळ आता नावीण्याची जगताना सावध असावे जुने जे, ते सोने असते ते मना समजवित रहावे मन:शांती हेची सुख खरे याचे सदा स्मरण असावे ******* –वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३१३ २९/११/२०२२

सुखावणारी सांजाळ

सरता दिवस, राहते उभी सामोरी सांज जशी प्रसन्न प्राची, तशीच सांजही सुंदर अंतरात भावनांची लोभस ती सोनसळी जीवा सुखावणारी सांजाळ क्षितिजावर सुखाचाच संसार, नाही कुणाशीही वैर तृप्तले, सारे जीवन केले प्रेम सर्वावर आता आठविती क्षण सारेच हरवलेले होता आत्ममुख मन होई कातर कातर आता न अंतरी सुखदुःखाचे मोजमापदंड सारेच आपुले, हाच भाव जागो निरंतर जगताजगता राखावित […]

गंधाळ प्रीतीचा

गंधाळ प्रीतीचा अजरामर चाफा प्राजक्त बकुळ मोगरा गुलाब जाई निशिगंध लाजरा तो तुच माळलेला गं गजरा… धुंद बेधुंदले आसमंत सारे आजही तोच माहौल न्यारा ओढ़ प्रीतीची आसुसलेली लोचनी तुझा प्रसन्न चेहरा… तुच गंधाळ सुमनी कुसुम सुगंधा दरवळ तो मनास भुलविणारा मी सारे सखये विसरू कसे गंधाळणारा तो तुझा गजरा… ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. […]

श्रीमंती

स्मृतीलहरींच्या झुल्यावरती मी नित्य सुखात झुलतो आहे आठव सारेच गगनभारले भावशब्दातुनी गुंफीत आहे सुखदुःखांची संमिश्र सावली अजुनही ती साथसंगती आहे मनांतर कधी नाही बदलले संवेदना नैसर्गी तीच आहे जढणघड़ण सुंदर संस्कारांची जीवन आज कृतार्थी आहे मैत्र नात्यांचे छान लाभले हीच जन्माची श्रीमंती आहे — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०९ २८/११/२०२२

रिक्तपण

परवलीचाच शब्द आता हे माझे अन तेही माझे स्वार्थाचा हव्यास आगळा जे आहे ते सारे माझे खरे कुणाचे काही नसते तसे जगणेच ठरते ओझे प्रेमभाव एक बाजार आता नाते एक कर्तव्याचे ओझे सत्य केवळ श्वास क्षणाचा अंती कळते रिक्तपण माझे जेंव्हा होई जीव कासाविस विसरूनी जाते तुझे माझे ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०८ […]

वंदनीय बाबासाहेब आंबेडकर

वंदन वंदन त्या विभूतीला.. मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।। जो जाणतो अर्थ मानवतेचा.. मानव! एकच धर्म मानवी.. सर्वाठायी एकची आत्मा.. वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१ विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही.. स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक.. जगती, मानवतेचाच पुजारी.. वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२ प्रज्ञावंती, नितीज्ञ तो सहिष्णू.. मानवी संस्कृतीचा अध्यापक.. बुद्ध! आगळाच परिवर्तनाचा.. वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..३ भारतीय संविधानाचा उद्गाता.. जगतवंद्य! हा श्रेष्ठमहामानव.. अमर, देशभक्त भारतभूमीचा.. […]

1 18 19 20 21 22 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..