नवीन लेखन...

समाधानी अश्रू

बांधले होते सुंदर घरटे,   कौशल्य सारे एकवटूनी वृक्षाच्या उंच फांदिवरी,  लोंबत होते झोके घेवूनी…१, दूर जावूनी चारा आणिते,   पक्षीण आपल्या पिल्याकरिता जग सारे ते घरटे असूनी,  स्वप्न तिचे त्यांत राहता…२, वादळ सुटले एके दिनी,   उन्मळून पडला तो वृक्ष पिल्लासाठी ती गेली होती,   शोधण्यासाठी आपले भक्ष्य…३ शाबूत घरटे फांदी वरते,  वृक्ष जरी तो पडला होता पिल्लामधली ती […]

बेफाम

तुझा उपयोग नाही काम झाल्यावर तुला उमजेल का आराम झाल्यावर ? पुढे घेऊन जाते सायकल साधी कधी रस्त्यात ट्राफिक-जाम झाल्यावर तुला समजेल बघ आहे किती सुंदर ! तुझे आयुष्य इन्स्टाग्राम झाल्यावर नवे खाते, नवा डी.पी., नवा नंबर विसर ओळख जुनी; बदनाम झाल्यावर तुझा आवाज बाकी गोड आहे; पण नको बोलूस तू बेफाम झाल्यावर बदल घडला जरी […]

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका

शंभर वर्षे जगा तूम्हीं,  काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे मध्येच सोडूनी गेले, नाटक […]

विसरण्यातील आनंद

विसरण्यातच लपला आहे,  आनंद जीवनाचा आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा…१ दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी….२ वस्तूच्या त्या होवूनी आठवणी,  सुख देई आम्हांला क्षणिक असती सारे सुख,  दु:ख उभे पाठीला…३ उपाय त्यावरी एकची आहे,  विसरून जाणे आठवणी विसरूनी जातां त्या सुखाला,  दु:खी होई न कुणी…४ एकाग्र […]

 साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे […]

तलम धागा

कळेना चालला आहे तुझा त्रागा कशाला कधीचा राहिला आहेस तू जागा? कशाला ? जिथे चिटपाखरूही फारसे फिरकत नसावे मला बोलावते आहे अशी जागा कशाला ? तुलाही वाटले होतेच की हे शेवटाला – कुणाला वावगे वाटेलसे वागा कशाला ! किती फुललेत रस्ते दाट गर्दीने सभोती हव्या आहेत लोकांना तरी बागा कशाला ? असे झाकायचे आहे खरोखर काय […]

  दुजातील ईश्वर

दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर  । ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार  ।। देह समजून मंदिर कुणी,  आत्मा समजे देव  । त्या आत्म्याचे ठायी वाहती,  मनीचे प्रेमळ भाव  ।। आम्हा दिसे देह मंदिर,  दिसून येईना गाभारा  । ज्या देहाची जाणीव अविरत,  फुलवी तेथे मन पिसारा  ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता,  स्वार्थ दिसे मग पदोपदी  । […]

हे तुझ्या हातात का नाही

शक्यता अजिबात का नाही ? देव अस्तित्वात का नाही ? मोकळा असतो बर्‍यापैकी वेळ जाता जात का नाही ! चांगली ही, छान तीही पण.. पण तरी ती बात का नाही ? काय आपण बोललो होतो हे तुझ्या लक्षात का नाही ? लागला बाजार सौख्यांचा एकही स्वस्तात का नाही ? पिंजर्‍याच्या आतला पक्षी खात किंवा गात का […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो   पहाट होता चिमण्या उडाल्या    काढून […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला   । शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   ।।१।। जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती   । झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   ।।२।। किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे   । रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   ।।३।। विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर   । राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   ।।४।। पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे   । पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   ।।५।। संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी   । परिसर तो निर्मळ करुनी […]

1 198 199 200 201 202 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..