नवीन लेखन...

  वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]

अर्थ

“अर्थ” चांदण्याही विझलेल्या चंद्रही जणू निजलेला सावळले नभ सारे गाती वाहते वारे ——————तू कुठे?!!१ थेंब थेंब शिडकावा कुठूनसा हळु व्हावा वाऱ्याच्या कुणी पाठी झाडे का झिंगताती ———————तू कुठे?!!२ कसली ही झाली नशा धुंद जशा दाही दिशा पंखाविन तरल तनु अवकाशी झेप जणु ———————तू कुठे?!!३ जिवनाचा अर्थ नवा चराचरा उमगावा या हळव्या क्षणी जरा स्पर्श हवा प्रेमभरा […]

दुष्टाचा मृत्यु

सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली […]

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

काठी म्हातारपणाची…..

कष्ट करुनी अपार शिकवीतात मुलांना करुनी स्वप्नांचा चुराडा वाढवतात मुलांना बघतात ते स्वप्न मधुर मुलगा त्याच्या शिकवता॑ना किती शोभुन दिसेल मुलगा आपला मोठ्या खुर्चीवर बसतांना वाटतें त्यांना आधार मुलगा आपल्या म्हातारपणाची काठी मग हेच मुलं लावतात आपल्या आई वडिलांना वृद्धश्रमाच्या वाटी दुःखाच्या सागरात त्यांनां आठवतात ते क्षण यांच्याच साठी हिंडलो आपण वनवन अश्या विश्वास घातने तुटते […]

बहर

तुला मी मला तू किती जपलं आजवर मनात तेच रुजलंय खूप खूप खोलवर ! त्याचा बहर मनांत खुलतो तुला नि मला दोघांनाच कळतो ! — ….. मी मानसी

बागेतील्या तारका

बागेमधला निसर्ग सारा, टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी, बाग झाली रिकामी ||१|| बाकावरती बसून एकटा, मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो, अंक चुकवी सारे ||२|| अगणित बघुनी  संख्यावरी, प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला, राहिले नाहीं भान ||३|| शितलेतेच्या  वातावरणीं, शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी, पहांट ती झाली ||४|| गेल्या निघूनी सर्व तारका, आकाशाला सोडूनी शोधूं लागले नयन माझे, त्यांना सर्व दिशांनी ||५|| चकित झालो […]

कुणी असे कोणी तसे

कुणी असे कोणी तसे, कित्येक काही ठरवतात, मध्येच काय मग बिनसते, सगळेच डाव मोडतात,–!!! कोण येते आणिक आपुली, जादू करुनी जाते,– नाम तिचे असते नियती, नियत ते परास्त करते,–!!! ठरवून गोष्टी बिघडती, आकस्मिक बसतात धक्के, एकदम मग कोण कसे, माणसास कळून चुके, –!!! राजकारण,अनीतीअन्याय, किती गोष्टींचे आपण बळी, सत्तालोलूप मदांधांमुळे, जनता चिरडली जाई खरी,–!!! पैसा एक […]

तुझ्याविना

उगाच हे नसूनही, दिसायचे असायचे तुझ्याविना कसे कसे, जगायचे उरायचे !! मनीच भाव आतले, जरा जरा जपायचे हळूच पापणीतले, दुःखही पुसायचे !! नवेच काही लाडके, तुझ्यापरी नसायचे तरीहि दंगदंगुनी, फुलात फुल व्हायचे !! रंग जीवनातले, जाहले फिकेफिकें खुळेच श्वास चंदनी , स्मरायचे, भरायचे !! — ….. मी मानसी

तारकापुंजाचे कौतुक व्हावे

तारकापुंजाचे कौतुक व्हावे, चंद्राचे तर नेहमीच असे, अवतीभोवती चांदणं घोळका, तरच चंद्र उठून दिसे,–!!! खरेतर चंद्रावरती, डाग किती, चांदणे केवढे असते निखळ, लुकलुकण्याची किमया त्यांची, चंद्राच्या तर न गावी निव्वळ,–!! नियम दुनियेचा कठोर असे मोठा तोच पुढे येतो, लहानांना विसरती सारे, मोठेपणाच श्रेष्ठ ठरतो,–!!! चांदण्यांची सैर चालू, अहोरात्र, दिनांतरी, चांदव्याचा खेळ चालतो, आमुच्याशी निरंतरी,–!!! ढगाढगांतून तो […]

1 202 203 204 205 206 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..