नवीन लेखन...

 ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान […]

आर्त तन हे, आर्त मन हे

आर्त तन हे, आर्त मन हे, करुणानिधे,तुला साद रे, शांती, प्रेम, आस्था, गेल्या भावना कुठे रे,–!!! उगा काळीज उलते, मन किती धास्तावते, का मम अंतरातुनी, अस्वस्थपण छळते रे,–!!! सांग तुझ्याविना माझा, असेल कोण त्राता रे, कोलाहल दाटे मनी, ही जीवनाचीच करणी, घायाळ हृदया, न वाली, जावे कुठे,विधात्या रे,–!!! सुखाची कशी वानवा असे, दुःख, अमोज अगणित रे […]

साथ लतावेलींची

साथ लतावेलींची, सोबत झाडफांद्यांची, संगत तूप साखरेची, तशी जोडी आपुली, आपण दोघे पती-पत्नी असूयांत जन्मोजन्मी,–!!! हिमगौरी कर्वे.©

संध्यासमय येताच पक्षी

संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले, किती दूर, किती योजने, लांबवरी फार उडाले,–||१|| किलबिलाट करत पिल्ले, असतील वाट पाहत, सय येता त्यांची एकदम, पंखात जसे बळ शिरत,–||२|| आपुले घरटे नजरेस पडतां, जीव भांड्यात कसा पडे, पिल्ले सुरक्षित पाहता, आनंदओसंडे चहूकडे,–!!||३|| धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार, नाग साप मांजरांचा , डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४|| नित्य कामास […]

चेतना

ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।। आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली चित्र बघूनी नाचे मन जे पाषाणा परी स्थिर कां झाले….१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे […]

किती पाहुणे उडून येती

किती पाहुणे उडून येती, या देशातून त्या देशात, स्थलांतर त्यांचे असे पाहुनी, चकित होतो आपण मनात,–!! हजारोंची संख्या त्यांची, एकरंगी नि एकढंगी, सारखेच सगळे दिसती, सारख्याच त्यांच्या ढबी,–!!! आभाळातून उडताना, बहुतेकांना ना थकवा, हे पाहुणे असती वेगळे,– वेळेवरती– आपुल्या गावा,–!!! आगळेपण त्यांचे उठून दिसे,–!!! किती पिढ्या गेल्या तरी, हजारो वर्षे येती ते, दरवर्षी परिपाठ असे,– मार्ग […]

बकुळीची ओंजळभर फुले

बकुळीची ओंजळभर फुले, तू देतां हातांत,– विसरून आपुले भान सारे, उभी राहिले अंगणात,–!! सुवास त्यांचा आसमंती, जरी ती असती ओंजळीत, बाहेरील जगाहून अधिक, दरवळ उरला माझ्या मनात,–!!! चोरटी ती भेट आठवे, लज्जेचे पांघरूण भोवती, संकोचांचे किती कब्जे, आज स्मृती मनी खेळती,–!!! तू हाती हात घेता , मी जशी फूल झाले , पाकळीगत नाजूक, बहरून कशी उठले,–!!! […]

जगण्यात मौज आहे

जगण्यात मौज आहे, सुखदुःखाची फौज आहे, रिवाजांचे शासन आहे, रीतींचे आसन आहे, आश्वासनांचे नभ आहे, निराशांचा पाऊस आहे, क्वचित आशेचा किरण आहे, कल्पनांचे साम्राज्य आहे, वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे, संताहून हळवे कुठे मन आहे, देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे, अत्याचाराचा विळखा आहे, कधी प्रेमाचा […]

पुनर्भेट

ही कविता जरुर वाचा आणि त्यानंतर… मी काया आणि तू आत्मा असं समजून सुद्धा वाचा… म्हणजे वेगळा अर्थ समजेल. […]

सरोवरात कमलिनी फुलतां

सरोवरात कमलिनी फुलतां, भ्रमर भोवती विहरू लागे, पाकळ्यांचे सौंदर्य पाहता, त्याचा मनमोर नाचू लागे,–! मोह पडे अगदी त्याला, टपोऱ्या मोहक कमळाचा, गुणगुणत मस्त मजेत, वाऱ्यावरती झोके घेत, उतावीळ एकदम तो, झटकन तेथे आला,–!!! ती आपल्याच नादात असे, ना तिच्या गावी त्याचे येणे, डुलता डुलता झुळकेबरोबरी,‌ तारुण्याचा तो आनंद उपभोगणे,–!!! मोहित भुंगा जवळी येता, गुंजारव सारखा करे,– […]

1 203 204 205 206 207 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..