नवीन लेखन...

ईश्वराचा वास कोठे

ईश्वराचा वास कोठे, प्रश्न नेहमी पडतो, फुलांफुलांतील सुगंध, मग त्याचे उत्तर देतो,–!!! आकार फुलांचे विविध, सुबक आणखी नाजूक, एक नाही दुसऱ्यासारखे, कोण त्यांना रेखितो,–!!! पानांचे रंग निरखून पहा, छटाही त्यांच्या निरनिराळ्या, कोण त्यांना असे रंगवे, रंगारी त्यांचा कुठला हा,–!!! फुलती कळी जवळून पहा, पाकळी पाकळी उमले, कोण त्यांचा जन्मदाता, आतून कोण त्यांना घडवे,–!!! एक फळ नसते […]

गोकुळीच्या आम्ही गोपिका

गोकुळीच्या आम्ही गोपिका, निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,–!! करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,–!! ठुमक ठुमक चालीची नक्कल करीत थांबशी, ‌‌ उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!! नको नको रे मारुस खडा, ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती […]

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला,   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

‘तू’

क्षणी पालटली कळा तूझा हात हाती आला माझा रुतु बदलला।।१।। नवा उगवला दिस तुला बांधुनिया पाशी भिरभिरे अवकाशी।।२।। काही उरले ना काज तुझा ध्यास निशीदिनी तुच स्वप्नी जागेपणी।।३।। जीव भारलेला असा तुझ्या नावाच्या पुढती सारी संपतात नाती।।४।। भान काळाचे नुरले आता आयुष्य ते किती तुझ्या श्वासांची गणती।।५।। …….।।मी मानसी।।

कोण जाणे कसे ठांवे

कोण जाणे कसे ठांवे,मन आज भरून आले, आठवणींच्या आभाळात, एकेक ढग जमा झाले,–||१|| बघता बघता एकमेकात, ते कसे खेळू लागले, हृदयांतरी स्मृतींचे मग, बिलोरी आरसे हलू लागले,–||२|| स्मरणांच्या हिंदोळ्यावर, झोके घेत झुलू लागले, इकडून तिकडे पाय हलवत, मन सैरावैरा धावू लागले,–||३|| गतकाळाचा जोर घेऊन, हिंदोळा वारंवार हाले, वरती जाता क्षणिक सुख, भासते कधी उगीच खरे, खाली […]

काही असले नसले

काही असले नसले, तरी आनंदातच जगावे, काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,–!!! ,मी मी करत करत, कमरेला बांधून गोष्टी, पैसाअडका, सोने-नाणे, सारे ठेवायाचे पाठी ,–!!! शेतीवाडी, जमीनजुमला, भाईबंद हक्क सांगती, भाऊबंदकी होऊन निव्वळ, तुटतात सगळी नाती गोती,–!!! हे माझे ते तुझे, कशासाठी, आपपरभाव,-? स्वार्थ आपमतलब शेवटी, करून दु:खी होतो मानव,–!!! सख्खे, सख्खे न राहती, […]

हट्टी अनु ( बाल गीत )

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

आज यमुनेचा उर

आज यमुनेचा उर,किती भरुनी आला, आनंदाने पाण्या तिच्या, पूर भरतीचा आला,–!!! गोकुळातील नंदकिशोर, मदतीस तिच्या धावला, कालिया — मर्दनाने, गोकुळीचा त्राता झाला,–!!! गोकुळ तिचे सर्वस्व असता, बाल कान्हा तारक झाला, भितीने तिची काया थरथरता कृष्णस्पर्शे, जीव कृतार्थ झाला-! गोकुळावरील संकट केवढे, गोपगोपिकांवर जीवघेणे, गारठून भीतीने गेले, कृष्णावताराने वाचवले,–!!! लहानगे ते पुढे धावतां, बेचैनी येईल त्यांच्या चित्ता, […]

किती रंग या जीवनी पहावे

किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे, रोज रोज नवीन ताजे, दुःख जिवापाड सोसावे,–!! ठरवलेले नेहमी चुकते, विपरीत काही घडते, अगणित अपेक्षांचे ओझे, इवल्या हृदयाने पेलावे,-? जे विधायक, ते दूर राहते, नकारात्मक ते सारे घडते, आपल्याच जिवाचा बळी रोज नव्याने पहावे लागते,-!! मदतीचा हात करता पुढे, आरोपांना पेंव फुटते , आंधळ्या निर्जन आयुष्याला , […]

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या त्या दाढे मधूनी, […]

1 207 208 209 210 211 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..