भावनांचा पाझर
गहिवरलेल्या अव्यक्ताला भावनांचा फुटतो पाझर भेटीसाठी आसुसलेले शब्दशब्द होती अनावर उलघाल अधरी मौनाची नेत्री दाटुनी येते अंबर सावळबाधी धूसर सारे कातरवेळ कातर कातर व्यथा मनीची बावरलेली तरी प्रसवते काव्य सुंदर शब्दाशब्दांची ओढ़ लाघवी सुखावतो हा जीव निरंतर ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३०७ २६/११/२०२२