ब्रम्हांडातील ग्रहतारे
ब्रम्हांडातील ग्रहतारे, दुरून मजसी दिसती, सारे सवंगडी माझेच, राहती दूर अंतरी,–!!! नाव माझे वसुंधरा, माझ्यावरच जगते सृष्टी, सृजनाची किमया न्यारी, पाहता पाहता झाली मोठी,–!!! खाली मी एकटी, एकाकी, आभाळा पाहत राहते, भास्कर करतो वंचना तरी, सारखी सहज सहत राहते,–!!! सहनशीलता का माझ्यागत, सांगा आहे कोणामध्ये, अंतराळातून वेगळे काढले, दुःख माझ्या काळजामध्ये,–!!! माता म्हणून स्वीकारले, मी माझे […]