उदरांतील शेषशायी
मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच […]