नवीन लेखन...

बीजाचे समर्पण पहावे

बीजाचे समर्पण पहावे, स्वतःला देऊन टाकते, एक तरु जन्माला यावे, म्हणूनच स्वतःला गाडते,—!! पुन्हा मातीत रूजून, एकदम कात टाकते, अंकुराचा स्वरूपाने , मातीच्या कुशीत येते,–!!! काळी आई कुरवाळते , सर्व संगोपन करते, बघता बघता नजरेत भरते, अंकुराचे फोफावणे, –!!! अंकुराचा त्याग करून, बीज वाढीस लागते, रोपट्याच्या स्वरूपात, सानुले झाड उगवते ,–!!! रोपट्याला फुटती पाने, त्यांचेही वर […]

वाऱ्यावरती हलती तरुलता

वाऱ्यावरती हलती तरुलता,पाने,फळे त्यातून बहरती, निसर्गाची किमया सारी, मानवा तू शिकणार कधी,-!!! सारी संपत्ती निसर्गाची, तुझा देह ही केवळ माती, का एवढी अहंता बाळगी, मातीमोल सारे,मिळता गती,-!! मी, माझे, माझे करत राहशी, वृत्ती का नसावी समाधानी,–? धरातली नच तुझे काही, — तुज याची जाणीव नाही,–!!! त्याग शिकवतो निसर्ग केवळ, दातृत्व त्याचे मोठे किती, कळले ज्याला तो […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  […]

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी…

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी , हे हवं , ते हवं इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, बॅग हलकी स्वतः पुरती आता फक्त […]

भाषा जिला गौरवते

भाषा जिला गौरवते, त्या मातीचेच गान , मातेहूनही ती मोठी, भाषा देत असे अधिक वेलांटी,–! ती आहे सृजनांत , सर्वांची काळी आई, तिच्या कुशीतून जन्म घेतो, आपण सारे, पक्षी, प्राणी, –! ती करते जसे संगोपन, जिवांचे नित्य जतन, म्हणूनच तिला रोज करावा, नेमाने आपण प्रणाम,—! काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व, जीवनातील संजीवनी, तिच्याविना सृष्टी […]

आनंदाने नाचत गात

आनंदाने नाचत गात, घेत हृदयाचे ठाव , चाललो मी पुढे पुढे , झरा माझे नाव,–!!! कपारीत डोंगराच्या, जन्म होई माझा, झुळझुळ वाहत जाता, होत असे मी मोठा,–!! शांत निर्मळ पाणी, हळूहळू पुढे जातसे , पारदर्शक थेंब लोलक, नजरेत ना भरती कसे,–!! असे धवल थेंब धावती, त्यांची बनते सुरेख नक्षी, ती बघण्यास उत्सुक हा, सारखे येती माझ्यापाशी,–!! […]

रोपाचे बनता झाड

रोपाचे बनता झाड, फांदी अन् फांदी डंवरे, सडा पडे खाली फुलांचा, जणू गालिचाच पसरे, फांद्या फुटण्याआधी कसे, धुमारे तिथे फुटती, बघतां बघतां आकार वाढून, तिज फांदी म्हणती, किती बहर येई फुलांचा, ती भरे *नखशिखांत बघणारा हरखून जाई , कुठे फांदी-? याच भ्रमात, फूल अन् फूल उमले, जागा नाही कुठे उगवण्या लेकुरवाळ्या फांदीलाही, अभिमान वाटे मिरवण्यां, फुले […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो,  घाण वाटली मजला अमंगल संबोधूनी,  लाखोली देई तिजला….१, संतापूनी मजवर , कान उघडणी केली तुझ्याचमुळें मुर्खा मी,  अमंगळ ती ठरली,   २ आकर्षक रूप माझे,  लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी,  केले सारे तूंच फस्त   ३ परि मिळतां तुझा तो,  अमंगळ सहवास रूप माझे पालटूनी,  मिळे हा नरकवास   ४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

हिरव्या पानात लगडलो

हिरव्या पानात लगडलो, पांढऱ्या शुभ्र मोगरी कळ्या, एकेकच हळूहळू जन्मतो, स्वभाव धर्मानेफुलणाऱ्या, गोऱ्या रंगावरी आमुच्या, जनहो नका हो भाळू, टपोरेआकार पाहुनी, मोहून नका हो हाताळू, कौमार्य फुलते आमचे, दुरुन बघावे, हेच उचित, मुसमुसत्या तारुण्याला, ठेवा तुम्ही अलगद, मगच उमलेल फूल हे सुंदर , येईल मोगऱ्याला बहर, स्पर्श न करता नेत्रसुख घेता, घ्या हो आमुचा आस्वाद, किती […]

दोन पेगची मजा

थोडी थोडी प्या घाई करायची नाही दोन पेगची मजा चार पेगमध्ये नाही नको तो हॅंगओव्हर दुसरा दिवसही छान पिताना राहू द्या थोडे तरी भान फुकट मिळाली तरी जास्त ढोसू नका घ्या तुम्हीच काळजी नको ते वका वका ग्लासकडे लक्ष द्या खम्ब्याकडे नको मला घरी सोडा मित्रांना विनंती नको चालता आले पाहिजे चालविता आली पाहिजे आपल्याच घरी […]

1 213 214 215 216 217 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..