नवीन लेखन...

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी,  दुर्घटना ती घडली अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले. घिरट्या घालीत काळ आला,  झडप घातली त्याने वेळ आली नव्हती म्हणूनी,  बचावलो नशिबाने अपमान झाला होता त्याचा,  सुडाने तो पेटला थोड्याशाच अंतरी जावूनी,  दुजाच बळी घेतला. डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

रूप असे देखणे

रूप असे देखणे काळजां भिडले भारी, डोळे असती लकाकते, पाणीदार जसे मोती, काया कशी तुकतुकीत, नजर फिरता हाले, सुंदर तांबूस वर्ण, त्यावर पांढरे ठिपके, शिंगांची नक्षी डोई, दिसते वर शोभुनी, हिंडते बागडते रानी, कुणी बालिका की हरणी, –?? चपल चंचल वृत्ती, अचूक आविर्भाव मुखी, क्षणोक्षणी मान वेळावी, भय दाटले नयनी,–!!! पाय मजेदार हलती, नाजुकसे ते हडकुळे, […]

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून […]

मित्रराज उगवताना

मित्रराज उगवताना,सृष्टीवर घडे करामत, आभाळ उतरे जळात, त्याचे रूप दिसे पाण्यात, लोक आरस्पानी निळे सौंदर्य, नजरा खिळवून ठेवी, हलते डोलते आभाळ, पाण्यात प्रतिबिंबित होई, वृक्षांचे समूह किती, धरतीवर पेरलेले, निळाईत उठून दिसती, हिरवाईने नटलेले ,–!!!! तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई, प्रकाशाचे किरण घेऊनी, दिनकराचा प्रवेश होई, अंधारी बुडालेली सृष्टी, रंग तिचा बदलून जाई, कडेकडेने […]

एका हिंदी कवितेचा मुक्त अनुवाद

चादर कायेवर लपेटून,धुक्याची, पायवाटेची सैर करावी, थेंब स्पर्शती पायांना अनवाणी, जाणीवही ती सुखावह किती,–!! निळे-गहिरे स्वैर तरंग, हृदयाला जेव्हा छेदती, असेच आपुले गुपित एखादे, ते कसे उलगडती,–! केसांच्या बटांना स्पर्शून, झुळूक जाते एखादी, आपल्या प्रेमाची जाणीव, देऊन जाते ना कधी,–!!! दूरवर उभ्या झाडांवर, पक्षी कूजन करिती, हृदयाला ताजेतवाने, करुन सोडती अगदी, शिवाय मोसम हा असा, थंडी […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

तुझ्या माझ्या मिलनी

तुझ्या माझ्या मिलनी,गंधाळली रातराणी, वारा सांगे गुजगोष्टी, तुझी माझी प्रेम कहाणी, चाफा वरती वरती फुले, त्याचे झुळकांवरी झुले, जाईजुईचे मांडव खाली, मोगऱ्याचे त्यास विळखे सायलीचा नाजूक मंद, गंध सुवासिक करे धुंद, अबोलीचे झुबके केवढे, कानोकानी सांगते गुपित, उधळीते बकुळ आपुली, सुगंधित फुले चहूकडे, दरवळू दे प्रीत सुगंधी, घालते कुलदेवां साकडे, शैया गुलाबांनी फुलली, बहरून ये पाकळी, […]

कोण दिसे हा पाण्यामध्ये

कोण दिसे हा पाण्यामध्ये, असावा माझाच भाईबंद, चोच बांकदार, रूप देखणे, मनाने दिसतोय स्वच्छंद, गुबगुबीत पांढरी पाठ, कोरीव वर काळ्या रेघा, नजर शोधक पाण्यात, भक्ष्यच भागवेल भुका , सुळकन जो वर येईल, मटकावेन आधी त्याला,–!!! कळणारही नाही याला, कधी गिळले मी माशाला,-? डोळे तीक्ष्णमाझे, नजरही अगदी करडी, पाण्यातील या पक्ष्याची, मात्र भासे मज बेगडी,–!!!! हिमगौरी कर्वे.©

शान्त समईत जशी वात

शान्त समईत जशी वात, तशी समाजात स्त्री जात, जळून जळून प्रकाश देत, क्षणिक फक्त मोठ्या होत,–!!! पणतीची ज्योत तशी, आमुची ही असे जात,– जगच छोटे भोवतालचे,– स्वयंप्रकाशी मोठे करत, लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत, मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,–!!! नंदादीपातील जशी ज्योत, स्त्री तशी तिच्या संसारात, हळूहळू अगदी तेवत,–!!! दुसऱ्याला प्रकाशमान करत,–! निरांजनातील छोटीवात, […]

1 215 216 217 218 219 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..